जेजुरीः श्री दत्त मित्र मंडळ, ट्रस्ट यांच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा द अॅायकॅान अवार्ड देऊन गौरव करण्यात येतो. या मंडळाचे यंदाचे हा गणेशोत्सव साजरा करण्याचे ८ वे वर्ष होते. मंंडळाच्या वतीने कला क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या पुरंदर तालुक्यातील कला दिग्दर्शक संदीप इनामके यांना यंदाचा द अॅायकॅान अवार्ड २०२४ देऊन त्यांच्या कार्याची दखल घेत सन्मान करण्यात आला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संभाजी झेंडे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी जेजुरी नगरपालिकेचे मा. नगरसेवक जयदिप बारभाई, मानव विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. धनंजय भोईटे, प्रसाद खंडागळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
संदीप इनामके यांच्या कार्याचा आलेख पाहिल्यास त्यांनी कला क्षेत्रातून शिक्षण घेत आपल्या करिअरची सुरूवात सिनेमा इंडस्ट्रीत केली. सुरुवातीच्या काळात एका लघुचित्रपटासाठी त्यांनी कला दिग्दर्शनाचे काम केले. पुढे जाऊन मराठीत उदाः ख्वाडा, मी पण सचिन, सत्यशोधक अशी भली मोठी लिस्ट त्यांनी केलेल्या सिनेमाच्या कला दिग्दर्शनाची आहे. नुकताच डंका हरिनामाचा हा सिनेमा येऊन गेला, तो सिनेमा ५० त्यांनी कला दिग्दर्शनाचे काम केलेला सिनेमा होता. तसेच गणेशोत्सवासाठी देखील मोठे मोठे सेट त्यांनी डिझाईन केले होते. त्याचा सुंदर असा देखावा पुण्यातील मंडळामध्ये करण्यात आला होता. त्यांना यंदाचा द अॅायकॅान अवार्ड पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी मंडळाचे व आयोजकांचे मनापासून आभार मानले.