मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आमदार संग्राम थोपटे यांची माहिती
भोरच्या एसटी बस आगारात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या २० बस मिळाव्यात अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे केली असता त्या पाठपुराव्याला यश मिळत भोरच्या आगारात नवीन ११ बस मिळणार असल्याची माहिती आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.
भोर आगारात एसटीच्या बस कमी असल्यामुळे आणि असलेल्या बस अनेक वेळा नादुरुस्त,खराब झाल्या असल्यामुळे प्रवाशांना पुरेशी सेवा मिळत नाही. त्यामुळे आमदार थोपटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य परिवहन महामंडळाला पत्र लिहून एसटीच्या २० नवीन बसेसची मागणी केली होती. त्यास प्रतिसाद देत राज्य परिवहन महामंडळाने ११ नवीन एसटी बस देणार असल्याचे सांगितले आहे. पुढील काही दिवसात नवीन ११ बस भोर आगारात दाखल होणार आहेत. नवीन एसटी बसमुळे भोर- पुणे आणि लांब पल्ल्याच्या बंद केलेल्या फेऱ्या पुन्हा सुरु होणार आहेत. याशिवाय शालेय विद्यार्थ्यांची आणि तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे असे आमदार थोपटे यांनी सांगितले .