भोर- शहरात विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणारे वेताळ पेठेतील तुफान मित्र मंडळाने वृक्षारोपण करत अनोखा उपक्रम राबविला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, पर्यावरण जनजागृती करिता भोर शहराचे ग्रामदैवत असणाऱ्या वाघजाई माता मंदिर परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड या मंडळातील सभासदांनी केली .
वृक्ष लागवड करताना मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, तरुण वर्ग व जेष्ठ सभासदांनी मोठा सहभाग घेतला. यापूर्वी गणेशोत्सव काळात सामाजिक जिवंत देखाव्याद्वारे तुफान मित्र मंडळ समाजाला चांगल्या प्रकारचा संदेश आहे. झाडे लावा, झाडे जगवा, झाडे वाचवा व निसर्गाचे संरक्षण व संवर्धन करण्याचा संदेश या मंडळाकडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.अनंत चतुर्दशीला या मंडळाच्या गणपतीचे विसर्जन होते.