शिक्रापूर: शेरखान शेख
केंदूर ता. शिरुर येथील पाचवड वस्तीमधील चार महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या एका नवविवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांत आकस्मात मृत्यू प्रकरणी नोंद करण्यात आली आहे.
केंदूर ता. शिरुर येथील २२ वर्षीय महिलेचा चार महिन्यांपूर्वी विवाह झालेला होता. ४ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास साक्षीने घरात गळफास घेतल्याचे कुटुंबियांच्या निदर्शनास आले. याबाबतची माहिती विवाहितेच्या आई वडिलांना कळताच त्यांनी घटनास्थळी येत नातेवाईकांच्या मदतीने या महिलेस उपचारासाठी रुग्णालयात हलवले.
मात्र, डॅाक्टरांमनी तिला मृत्यू झाल्याचे घोषित केले. याबाबत विवाहितेची आई मालती बाळासाहेब दौंडकर वय ४२ वर्षे रा. कन्हेरसर ता. खेड जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे माहिती दिल्याने पोलिसांनी आकस्मात मृत्यू प्रकरणी नोंद केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार संतोष शेळके हे करत आहे.