भोर: भारतीय जनता पक्षाचे भोर विधानसभा क्षेत्राचे निवडणूक प्रमुख किरण दगडे पाटील यांच्या माध्यमातून या विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या नागरिकांसाठी काशीविश्वेश्वर यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पुण्यातील खडकी येथून या यात्रेने रेल्वेद्वारे काशीकडे प्रस्थान केले. या यात्रेत जवळपास ३ हजार यात्रेकरु सहभागी झाले असून, ही यात्रा पूर्णपणे मोफत आहे. उद्या दि. १ सप्टेंबर रोजी ही यात्रा काशातील वाराणसी येथे सायंकाळी ४ वाजता पोहचणार असून, शेवटच्या श्रावणी सोमवारी भगवान काशीवेश्वश्वाराचे दर्शनाचे, भाग्य या यात्रेत सहभागी झालेल्या भक्तांना मिळणार आहे.
वेगळ्या दर्शन रांगेची व्यवस्था
श्रावणातील शेवटचा सोमवार दि. २ सप्टेंबर रोजी असल्याने मोठ्या प्रमाणावर भाविकांची रीघ काशीवेश्वेश्वर मंदिरात असणार आहे. यामुळे किरण दगडे पाटील यांनी देवसंस्थानला यात्रेतील भाविकांसाठी वेगळ्या दर्शन रांगेची व्यवस्था करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीला होकार मिळाला असून, भाविकांना देवाचे सुलभ दर्शन घेता येणे शक्य होणार आहे.
विधानसभा मतदार संघातील नागरिकांना मोफत काशीयात्रा घडविण्याच्या माझ्या स्वप्नातील चौथा टप्पा प्रत्यक्षात आलाय. आज ३१ ऑगस्ट रोजी काशीयात्रेसाठी सर्व यात्रेकरुंसह आम्ही रेल्वेने काशीच्या दिशेने प्रस्थान केले आहे. आपल्या सदिच्छा, आशीर्वाद आणि भगवंताच्या कृपेने मला हे धार्मिक, सामाजिक काम करण्याचं बळ मिळत आहे.
-किरण दगडे पाटील.
निवडणुक प्रमुख भोर विधानसभा, भारतीय जनता पार्टी