भोरः अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित पुणे जिल्हा वन्यप्राणी सर्परक्षक असोशिएशन यांच्या वतीने छत्रपती शिवाजी इंजिनिअरिंग कॅालेज धांगवडी येथे मार्गदर्शन शिबिर पार पडले. या शिबिराचे आयोजन पृथ्वीराज संग्राम थोपटे यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी प्रमुख उस्थितीती मानद सचिव स्वरुपाताई थोपटे यांची लाभली. या शिबिरात सर्प दंश झाल्यावर प्रथमोपचार काय करावे, विषारी व बिनविषारी सर्प कोणते, ते ओळखायचे कसे त्याबद्दल असणारी अंधश्रद्धा याविषयी या शिबिरात माहिती देण्यात आली.
डोंगरी दुर्गम भागातील सर्व विद्यार्थी तसेच ग्रामीण भागामध्ये बऱ्यांच अशा मुलांचे आई-वडील किंवा घरातील मंडळी शेती हा मुख्य पारंपरिक व्यवसाय करतात दिसतात. शेती करत असताना या वन्यप्राणी विधान विशेषतः सर्प आपल्याला दिसतात किंवा त्याविषयी ज्ञात अज्ञान माहिती आपल्याला असते. परंतू, सर्प विषयी जनजागृती झाली पाहिजे या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला मोठ्या संख्यने विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला.
यावेळी स्वरुपाताई थोपटे, महेश टापरे, महेश धाडवे, राजेश शेटे, सर्पमित्र विनायक मोहिते, विशाल शिंदे, नरेंद्र कांबळे, रोहन सालेकर, शंकर मालुसरे, सोमनाथ निगडे, राहुल खामकर ,राजेश शिंदे, आनंद खुडे उपस्थित होते.
पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशन यांच्या माध्यमातून राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये उपक्रम होत आहे. उपक्रमासाठी इथे उपस्थित असलेले पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेशजी कापरे त्याचप्रमाणे, बाजार समितीचे संचालक धाडवे,शेटे त्याचप्रमाणे राजेशजी शिंदे यांनी या कार्यक्रमाचा आयोजन केले. ज्यांनी माझ्याशी संपर्क साधला असे राजेश शिंदे त्याचप्रमाणे विनायकजी मोहिते, विशालजी शिंदे, नरेंद्रजी कांबळे, रोहनजी साळेकर त्याचप्रमाणे आलेले पत्रकार आणि इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य पाटील सर, खोपडे सर त्यांच्या सर्व स्टाफ आणि विद्यार्थी मित्रांनो आजचा हा कार्यक्रम हा एक आगळावेगळा कार्यक्रम आहे.
–स्वरुपाताई थोपटे,मानद सचिव राजगड ज्ञानपीठ