पुणे: शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात शाळेत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीला फूस लावून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला दारू पाजत बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात पीडितेच्या मैत्रिणीचा समावेश असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी दिली आहे.
पीडित मुलगी आणि आरोपी मुलाची आधीपासून ओळख झाली हाेती. त्याने या मुलीला प्रेमाचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढले. तिच्यासोबत प्रेमाचे नाटक केले. गोड बोलून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर एक दिवशी मुलीच्या मैत्रिणीने मुलीला फूस लावून एका मित्राच्या घरी नेले. तेथे तिला दारु पाजण्यात आली. दारुच्या नशेत मुलीच्या मित्राने तिच्यावर बलात्कार केला. मित्राबरोबर असलेल्या दुसऱ्या मुलाने मोबाइलवर तिची नग्न आणि शरीर संबंधाची छायाचित्रे काढली. या प्रकरणातील सर्व आरोपी अल्पवयीन आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षयकुमार गोरड करत आहेत.