प्रतिनिधी-कुंदन झांजले
किरण दगडेपाटील यांचा आरोग्यविषयक उपक्रम, भोलावडेतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सध्या भोर तालुक्यासाठी आरोग्यदूत म्हणून ओळखले जाणारे भारतीय जनता पक्षाचे भोर विधानसभा प्रमुख व पुणे महानगरपालिकेचे आदर्श नगरसेवक किरण दगडेपाटील यांच्या संकल्पनेतून भोलावडे (ता.भोर) येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उदघाटन भोलावडे गावचे सरपंच प्रवीण जगदाळे, राहुल दगडे पाटील, भाजपचे तालुका अध्यक्ष जीवन कोंडे,भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष व भाबवडी गावचे आदर्श सरपंच अमर बुदगुडे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरामध्ये ७०० नागरिकांची नेत्र तपासणी केली त्यापैकी ५५० जणांना मोफत चष्मे देण्यात आले व ७२ नागरिकांची नेत्र मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोफत केली जाणार आहे या शिबिरासाठी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे येथील नेत्र चिकित्सक डॉक्टर व त्यांचे सहकारी यांचे सहकार्य लाभले असल्याची माहिती भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अमर बुदगुडे यांनी दिली.
संपूर्ण तालुक्यामध्ये किरण दगडेपाटील युवा मंच कडून ३५ हजार लोकांची मोफत तपासणी करणार असल्याचे भोर भाजपा विधानसभा प्रमुख किरणदादा दगडे पाटील यांनी सांगितले.यावेळी या शिबिरास भाजपचे ॲडव्होकेट कपिल दुसंगे , राजेंद्र गुरव, अमोल पिलाणे, दिपक मालुसरे, किरण दाखवले, उपसरपंच अविनाश आवाळे, माजी उपसरपंच गणेश आवाळे,ग्रा प सदस्य प्रशांत पडवळ, मंगेश आवाळे, बंडा तारू, तंटामुक्ती अध्यक्ष गजानन आवाळे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष दत्तात्रय अब्दागिरे, नितीन आवाळे, नागेश बदक, निलेश गावडे, सागर खुंटवड, रोशन सावंत, माऊली आवाळे, निलेश जाधव, दत्तात्रय खोपडे, अजय गुंड पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या शिबिरासाठी भोलावडेतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असे सरपंच प्रविण जगदाळे यांनी सांगितले.