प्रतिनिधी -कुंदन झांजले
भोर: नगरपलिकेकडून आकारण्यात आलेल्या शासकीय नियमानुसार १०% घरपट्टी करवाढीला भोर वेल्हा मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांनी दिलेल्या घरपट्टी करवाढ नव्याने करून सध्या आकारण्यात आलेली घरपट्टी करवाढ स्थगित करण्यात यावी अशा आशयाचे पत्रक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले त्यानुसार त्या परिपत्रकावर विचार विनिमय करून नव्याने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून सध्या आकारण्यात आलेल्या घरपट्टी करवाढीला स्थगिती देण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार ,भोर नगरपलिकेकडून २०२३-२४ ते २०२६-२७ या कालावधीकरिता नवीन घरपट्टी करवाढ शासकीय नियमानुसार शहरातील मालमत्ता धारकांना नोटीसा बजावल्या होत्या . परंतु शहरातील बहुतांश मालमत्ता धारकांच्या करवाढीत प्रचंड प्रमाणात घरपट्टी करवाढ झाल्याचे निदर्शनास आले.तसेच घरपट्टी करवाढ विरोधात भोरच्या जनतेत प्रचंड असंतोष पसरला होता.
नगरपलिकेविरोधात १२ ऑक्टोंबरला नगरपरिषद प्रशासनाविरोधात नागरिकांचा धडक मोर्चा निघाला होता.यामध्ये सत्ताधारींच्या विरोधात विरोधकांनी अनेक आरोप प्रत्यारोप केले परंतु सुरुवातीपासून आमदार संग्राम थोपटे यांनी झालेल्या घरपट्टी करवाढ विरोधात नागरिकांना हरकती घेण्यास सांगितले होते त्यानुसार शहरातील बहुतांश मालमत्ता धारकांनी हरकती नोंदविल्या कारणाने , कोरोना संकटकाळी भोरची आर्थिक परिस्थिती विस्कळीत झाल्याने व जनतेने केलेल्या आंदोलनामुळे भोर वेल्हा मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांनी घरपट्टी करवाढ विरोधात स्थगिती देण्यात यावी असे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले त्यानुसार त्यांच्या आदेशानुसार प्रधान सचिवांमार्फत नव्याने अहवाल द्यावा व आकारलेल्या घरपट्टी करवाढ विरोधात स्थगिती असे आदेश देण्यात आले आहे