Friday, October 23, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

शिरवळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये १५ ग्रॅम एमडी ड्रग्जसह शिरवळ येथील तरुण ताब्यात; पोलिसांच्या वाहनाला धडक देत पळण्याचा प्रयत्न

by SBPRNL
June 28, 2026
शिरवळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये १५ ग्रॅम एमडी ड्रग्जसह शिरवळ येथील तरुण ताब्यात; पोलिसांच्या वाहनाला धडक देत पळण्याचा प्रयत्न

शिरवळ, दि. २८ (प्रतिनिधी) : शिरवळ येथील एस.टी. बसस्थानक परिसरात अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एका युवकाला पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. त्याच्याकडून सुमारे १५ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे शिरवळ परिसरात खळबळ उडाली असून अमली पदार्थांच्या साखळीचा उलगडा करण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरवळ एस.टी. बसस्थानक परिसरात एक युवक एमडीची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून संशयितावर पाळत ठेवली.

You might also like

भोर उपविभागातील अवैध धंद्यांची ‘कलेक्शन ते कलेक्टर’ साखळी?

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

दरम्यान, मंदार मंगेश शहाणे (वय २१, रा. बाजारपेठ, शिरवळ) हा संशयित दुचाकीवरून तेथे आला. पोलिसांची चाहूल लागताच त्याने घटनास्थळावरून वेगाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ त्याचा पाठलाग सुरू केला. सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत पाठलाग केल्यानंतर शिंदेवाडी गावाच्या हद्दीत त्याला ताब्यात घेण्यात आले.

त्यानंतर संशयिताची झडती घेतली असता त्याच्याकडे सुमारे १५ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) हा अमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी तो जप्त करून संशयिताला अटक केली. यावेळी संशयिताच्या ताब्यातील दुचाकीही पोलिसांनी जप्त केली असून तिचा वापर अमली पदार्थांच्या वाहतुकीसाठी करण्यात आला होता का, याचाही तपास सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच फलटण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) तसेच फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकाने घटनास्थळाची तपासणी करून आवश्यक पुरावे संकलित केले.

जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची किंमत, त्याचा पुरवठादार, विक्रीचे जाळे तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास शिरवळ पोलीस करीत आहेत.

या प्रकरणी संशयिताविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर उपविभागातील अवैध धंद्यांची ‘कलेक्शन ते कलेक्टर’ साखळी?
क्राईम

October 19, 2026
वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार
वेल्हे

October 14, 2026
स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी
ताज्या बातम्या

September 7, 2026
खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
Next Post
शिंदेवाडी बोगद्यानजीक ११ बाईकस्वारांकडून व्यावसायिकाला बेदम मारहाण; वाहनाची तोडफोड

शिंदेवाडी बोगद्यानजीक ११ बाईकस्वारांकडून व्यावसायिकाला बेदम मारहाण; वाहनाची तोडफोड

ताज्या बातम्या

भोर उपविभागातील अवैध धंद्यांची ‘कलेक्शन ते कलेक्टर’ साखळी?

भोर उपविभागातील अवैध धंद्यांची ‘कलेक्शन ते कलेक्टर’ साखळी?

October 19, 2026
वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

October 14, 2026
स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

September 7, 2026
खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. अधिकृत सूचनासाप्ताहिक भूमिश्री (RNI क्र. MHMAR/26/A4837) यांचे राजगड न्यूज लाईव्ह हे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. साप्ताहिक भूमिश्रीच्या वतीने डिजिटल वृत्तांकन व संबंधित अधिकृत कामकाजासाठी राजगड न्यूज लाईव्ह कार्यरत राहील. सर्व संबंधित अधिकारी व प्रशासनाने याची नोंद घ्यावी.कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group