Tuesday, June 23, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

by SBPRNL
June 23, 2026
वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

भोर, प्रतिनिधी : वेनवडी परिसरात खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप वाहन पकडून वनविभागाने सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र, या कारवाईनंतर संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण लागले असून तालुक्यात विविध चर्चांना उधाण आले आहे. वनविभागाची ही कारवाई केवळ कायदेशीर होती की त्यामागे आर्थिक तडजोडीचा प्रयत्न होता, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खैर लाकडांची वाहतूक करणारे वाहन ताब्यात घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीविरुद्ध वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, गुन्हा दाखल होण्यापूर्वी काही आर्थिक व्यवहाराची चर्चा सुरू होती, असा दावा काही स्तरांतून केला जात आहे. यामुळे कारवाईच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

You might also like

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या चर्चेनुसार, वन विभागातील एका कर्मचाऱ्याकडून दोन लाख रुपयांच्या आर्थिक मागणीचा विषय समोर येत असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय, संबंधित संशयिताला मारहाण झाल्याचीही चर्चा तालुक्यात रंगली आहे. या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसली तरी या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्यानंतर कारवाईची संपूर्ण प्रक्रिया, पंचनामा, तसेच गुन्हा दाखल होण्यापूर्वी घडलेल्या घटनाक्रमाबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, आर्थिक मागणी व मारहाणीच्या चर्चांबाबत वनविभागाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे “वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न?” हा प्रश्न आता तालुक्यात चर्चेचा विषय ठरला असून या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(क्रमशः – भाग २ मध्ये : कारवाईनंतर नेमके काय घडले? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांना खतपाणी घालणाऱ्या घडामोडींचा आढावा.)

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
पुणे

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त
क्राईम

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू
भोर

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
महारेराचा खंडाळा परिसराला मोठा दणका; अनेक गृहप्रकल्प ‘लॅप्स’ घोषित, गुंतवणूकदारांमध्ये चिंता
खंडाळा

महारेराचा खंडाळा परिसराला मोठा दणका; अनेक गृहप्रकल्प ‘लॅप्स’ घोषित, गुंतवणूकदारांमध्ये चिंता

June 17, 2026
जन्मानंतरच मृत्यू की अन्य काही? नवजात बालिकेच्या मृतदेहाने खळबळ
क्राईम

जन्मानंतरच मृत्यू की अन्य काही? नवजात बालिकेच्या मृतदेहाने खळबळ

June 16, 2026
मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा
भोर

मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा

June 16, 2026

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group