Sunday, June 28, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor -भोर तालुक्यात मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानाचा शुभारंभ ; अभियानात गावांचा होणार काया पालट

तालुक्यातील पाच गावांना मिळणार अनुक्रमे ४५ लाखांची बक्षिसे

by कुंदन झांजले
September 18, 2025
Bhor -भोर तालुक्यात मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानाचा शुभारंभ ; अभियानात गावांचा होणार काया पालट

भोर – महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ही योजना १७ सप्टेंबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रभर राबवायचं ठरवलं आहे .भोर तालुक्यात विविध गावांमधुन ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडून या अभियानाचा (दि.१७) शुभारंभ करण्यात आला असून तालुक्यातील गाव स्तरावरील सर्व घटकांना समान न्याय ,समान संधी निर्माण करणे. कुठलाच घटक विकासापासून वंचित राहणार नाही, यासाठी नियोजन बद्ध प्रयत्न करणे, गावासाठी चांगल्या प्रतीच्या मूलभूत सुविधा निर्माण करणे, गावातील नागरिकांना स्वच्छ पाणी ,उत्तम आरोग्य सुविधा, पक्की घरं, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन करणे, सुशासनाच्या माध्यमातून शासन स्तरावरील सर्व सेवा नागरिकांना जलद आणि सुलभरीत्या कशा मिळतील यासाठी प्रयत्न करणे , निसर्गसंवर्धन करणे, गावांमधील पाण्याचा अपव्यय टाळून गाव हरित आणि जलसमृद्ध करणे , ग्रामस्थांच्या सहभागातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे, महिला बचत गट, शेतकरी बचतगट तसेच विविध विषयांच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून उपजिविकेचे साधन निर्माण करणे ,लोकवर्गणी, मननरेगा योजना, व इतर योजनांच्या अभिसरणातून गावातील मूलभूत सुविधा परिपूर्ण करणे अशा अनेक  मुद्यांवर गावातील नागरिक आणि ग्रामपंचायत स्तरावरील ,पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, महिला बचतगट, तरूण मंडळे या सर्वांच्या सामुहिक प्रयत्नातून गावागांमध्ये निकोप स्पर्धात्मक वातावरण निर्माण करून हे अभियान राबवायचे आहे. या अभियानाच्या स्पर्धेत सात प्रकारचे निकष उद्दिष्ट नेमून दिलेले आहेत त्यामध्ये १) सुशासनमुक्त पंचायत, २) सक्षम पंचायत ( स्वनिधी लोकवर्गणी ), ३) जलसमृद्ध स्वच्छ व हरितगाव , ४) मनरेगा व इतर योजनांचा अभिसरण ,५) गाव पातळीवर गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण करणे , ६) उपजीविका विकास गृहनिर्माण सामाजिक न्याय , ७) लोकसहभाग व श्रमदानाच्या माध्यमातून लोक चळवळ निर्माण करणे आणि विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार आहेत.

मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानासाठी शासनाने २४५ कोटींच्या वर पुरस्काराच्या भरीव निधीची तरतूद केलेली असुन , प्रत्येक तालुक्यामध्ये ४५ लाख रुपयांची पुरस्काराची रक्कम मिळणार आहे. पहिले बक्षीस १५ लाख ,दुसरे बक्षीस १२ लाख ,तिसरे बक्षीस ८ लाख रुपये आणि उत्तेजनार्थ दोन ग्रामपंचायतीसाठी अनुक्रमे ५ लाखाची दोन बक्षिसे, अशी एकूण ४५ लाख रुपये तालुक्यातील पाच गावांना मिळणार आहेत. गुणांवर आधारित ही स्पर्धा असून यातील सात उद्दिष्टांचे मूल्यमापन करून गावाचे क्रमांक ठरवले जाणार आहेत.भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी  उदय जाधव , यांनी भोर तालुक्यातील सर्व सन्माननीय माजी जिल्हा परिषद सदस्य , पंचायत समिती सदस्य सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी यांचेशी प्रत्यक्ष संपर्क साधून या अभियानात सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे तसेच तालुक्यातील आठ मध्यवर्ती ठिकाणी ग्रामपंचायत अधिकारी सरपंच उपसरपंच यांच्या बैठका घेऊन लोकांमध्ये उत्साह वाढवला आहे. दिनांक १७ सप्टेंबर या दिवशी तालुक्यातील सर्व गावांमध्ये ग्रामसभा पार पडल्या. ग्रामसभेला मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला तज्ञ अधिका-यांची नेमणूक करण्यात आली होती . गावांमध्ये जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. प्रत्येक गावामध्ये श्रमदान करण्यात आले . भोर तालुक्यातील नसरापूर, देगाव, नायगाव ,रांजे, माळेगांव, हायवे बु. , भोंगवली, कामथडी, नांदगाव, आंगसुळे , खानापूर, नाझरे, भोलावडे, बसरापुर, बारे खुर्द, बारे बुद्रुक, म्हाळवडी, गोरड म्हसवली अशा अनेक गावातुन स्वच्छता, जनजागृती, ग्रामसभा सभा घेऊन अभियानास प्रारंभ केला. जनतेमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना बाबत प्रचंड उत्साह दिसत असून नागरिक मोठ्या उत्साहाने अभियानात सहभागी होत आहे असे पंचायत समिती विभागाकडून सांगण्यात आले.

You might also like

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोर तालुक्यातील सर्व सन्माननीय पदाधिकारी ,अधिकारी कर्मचारी नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपल्या भोर तालुक्याचे नाव राज्यपातळीवर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदय जाधव साहेब व विस्तार अधिकारी  खंडाळे  यांनी केले आहे..

कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १
क्राईम

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
पुणे

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त
क्राईम

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू
भोर

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
महारेराचा खंडाळा परिसराला मोठा दणका; अनेक गृहप्रकल्प ‘लॅप्स’ घोषित, गुंतवणूकदारांमध्ये चिंता
खंडाळा

महारेराचा खंडाळा परिसराला मोठा दणका; अनेक गृहप्रकल्प ‘लॅप्स’ घोषित, गुंतवणूकदारांमध्ये चिंता

June 17, 2026
जन्मानंतरच मृत्यू की अन्य काही? नवजात बालिकेच्या मृतदेहाने खळबळ
क्राईम

जन्मानंतरच मृत्यू की अन्य काही? नवजात बालिकेच्या मृतदेहाने खळबळ

June 16, 2026
Next Post
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group