नदी पात्रात १६३१ क्युसेकने विसर्ग तर नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
नीरा खोऱ्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे भाटघर धरणाने ९३ टक्क्यांची सरासरी ओलांडली असून आज सकाळी भाटघर धरणातून नीरा नदीपत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. गतवर्षी या दिवशी ही दोन्ही धरणे ७३ टक्के भरली होती परंतु यावर्षी मात्र धरणात क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असल्याने भाटघर धरणाची वाटचाल शंभरीकडे चालली आहे. सद्यस्थितीला भाटघर धरण ९३.२५ % ,निरा देवघर ८१.३२% ,वीर -९२.८५% , तर गुंजवणी धरण – ७०.०५% पाणीसाठा झाला आहे.
सध्या धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने भाटघर धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने सकाळी आठ वाजता भाटघर धरणाच्या विद्युत निर्मिती केंद्र द्वारे नदीपात्रामध्ये १६३१ क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. याबाबत पाटबंधारे खात्याने सूचना जारी केलेल्या सुचनेत म्हणटले आहे, नदीपात्रात कोणीही उतरू नये, नदीच्या पात्रात कुठल्या विभागाचे काम सुरू असेल तर त्या विभागाने बांधकाम साहित्य व कामगार यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. तसेच नदीच्या काठावरील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नदीपात्रात पिण्याच्या व शेतीसाठी असलेले पंप सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. कृपया सखल भागातील संबंधीत नागरीकांना सूचना देण्यात याव्यात आणि उचित कार्यवाही करण्यात यावी. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग पुणे यांच्याकडून करण्यात आले आहे.