खजिनदारपदी दत्तात्रय बांदल तर सचिवपदी स्वपनिकुमार पैलवान
भोर – तालुका पत्रकार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी पत्रकार अर्जुन खोपडे तर उपाध्यक्षपदी जीवन सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड संघाच्या कार्यालयात पार पडलेल्या सभेत एकमताने करण्यात आली. सौहार्दपूर्ण वातावरणात झालेल्या या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अंकुश वीर यांनी जबाबदारी पार पाडली.
या निवडणुकीत एकमताने निवडून आलेल्या कार्यकारिणीत स्वप्नीलकुमार पैलवान यांची सचिवपदी, दत्तात्रय बांदल यांची खजिनदारपदी, किरण अंबिके यांची सोशल मीडिया अध्यक्षपदी, कुंदन झांजले यांची सोशल मीडिया उपाध्यक्षपदी, तर पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या अध्यक्षपदी माणिक पवार यांची निवड करण्यात आली.
कार्यकारिणी सदस्य म्हणून किरण भदे, वैभव भुतकर, संजय इंगुळकर, विजय जाधव, सारंग शेटे आणि सूर्यकांत किंद्रे यांचीही एकमताने निवड झाली.
या निवड प्रक्रियेच्या वेळी उपस्थित मान्यवरांमध्ये ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत जाधव, बाळासाहेब शिंदे, विलास मादगुडे, निलेश खरमरे, इम्रान आत्तार यांचा समावेश होता. तसेच जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष म्हस्के, विनय जगताप, तुषार सणस, सोमनाथ कुंभार आणि अनिस आतार यांचीही उपस्थिती होती.
सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित अध्यक्ष अर्जुन खोपडे यांनी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानून पुढील कार्यकाळात पत्रकार संघाच्या बळकटीसाठी व विकासासाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला तसेच पत्रकार संघातर्फे नवीन उपक्रम राबविण्यात येणार आहेत .तक्ष जीवन सोनवणे यांनी तालुक्यातील पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघटनात्मक बळकटपणा आणि व्यावसायिक सन्मान वाढवण्यासाठी कटिबद्ध राहू,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
या निवडणुकीनंतर भोर तालुक्यातील पत्रकारांकडून नवीन कार्यकारिणीकडून सकारात्मक अपेक्षा आणि आशावाद व्यक्त केला जात आहे.