भोर – आडवंटा एंटरप्राजेस प्रा.लिमिटेड कंपनीच्या सीआरएस फंडातुन कारी ग्रामपंचायतीला नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.
कारी हे गाव सुमारे ४ हजार लोकसंख्या असलेले रायरेश्वर किल्याच्या पायथ्यासी असलेले सरदार कान्होजी जेधे यांचे ऐतिहासिक गाव आहे .येथील ग्रामपंचायत कार्यालयास आरोग्य सूविधेसाठी रुग्णवाहिका हवी होती या ग्रामपंचायतीची गरज ओळखून आडवंटा एंटरप्राजेस लिमिटेड कंपनीचे डायरेक्टर प्रशांत बेलगमवार यांनी बिजनेस हेड अशोक जेधे यांच्या हस्ते रुग्णवाहिकेची चावी देऊन रुग्णवाहिका लोकापर्ण करण्यात आले. यावेळी कंपनीचे सतीष हेगडे, रेणीता काकाणी, सरपंच सतिश ढेबे, उपसरपंच गणेश जेधे ,ग्रा प सदस्य पोपट घोलप, रामचंद्र जेधे, रामचंद्र कुडले, जयश्री सणस, मनीषा तावरे, अल्पना मोरे, रेखा कांबळे, चतुरा सणस, ग्रामसेवक दयानंद निंबाळकर, लिपिक पूजा तावरे, शिपाई किशन घोलप व मोठ्या संख्येने ग्रामस्त महिला उपस्थित होते.यावेळी सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक दयानंद निंबाळकर यांनी केले.
“कारी हे गाव दुर्गम डोंगरी असुन आरोग्य सुविधेचा आभाव आहे.अचानक एखादी मोठी घटना घडली तर रुग्णाला भोरला घेऊन जावे लागते अशावेळी लवकर आरोग्य सुविधा मिळावी या उददेशाने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आडवंटा एंटरप्रायजेस लिमिटेड कंपनीच्या वतीने कारी ग्रामपंचायतीला अत्याधुनिक सोय सुविधा असलेली रुग्णवाहिका देण्यात आली आहे ,त्याचा सुयोग्य वापर करुन नागरीकांचे आरोग्य सुधारण्याचे कार्य करावे.”
प्रशांत बेलगमवार (बिजनेस डायरेक्टर आडवंटा प्रा.लि)- अशोक जेधे (बिजनेस हेड आडवंटा प्रा.लि)
“राञी अपराञी एखादी घटना घडली अपघात झाला.किंवा हदय विकारा सारख्या गंभीर घटना घडल्या तर रुग्णाला भोरला घेऊन जाण्यासाठी मोठी अडचण होत होती माञ आडवंटा कंपनी कडुन कारी ग्रामपंचायतीला अत्याधुनिक सुविधा असलेली रुग्णवाहिका दिल्यामुळे त्वरित आरोग्य सुविधा मिळणार असुन आरोग्याचा प्रश्न मिटणार आहे”
सतीष ढेबे (सरपंच कारी ता.भोर) – गणेश जेधे (उपसरपंच कारी या.भोर)