प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार किसान कार्ड शेतीविषयक सर्व सुविधा या कार्ड अंतर्गत दिले जाणार आहेत अशी माहिती
राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ जलदगतीने शेतकऱ्यांना देण्यासाठी केंद्र शासनाची ॲग्रीस्टॅक योजना राज्यात राबवली जात आहे या योजनेचा लाभ तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन भोरचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात व तहसीलदार राजेंद्र नजन यांनी केले आहे.
या योजनेचे फायदे – १)पी एम किसान योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी आवश्यकतेच्या अटी पूर्ण करून लाभ प्राप्त करण्यामध्ये सुलभता येईल.२) पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र सर्व लाभार्थी समाविष्ट करून घेण्यास सहाय्य मिळेल. ३) शेतकऱ्यांना पिकासाठी कर्ज मिळण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड व शेतीच्या विकासासाठी इतर कर्ज उपलब्ध करून देण्यास सुलभता राहील.४) पिक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापन शेतकऱ्यांचे देय नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यास सुलभता येईल.५) किमान आधारभूत किमतीवर खरेदीमध्ये शेतकऱ्यांचे नोंदणीकरण ऑनलाईन पद्धतीने होऊ शकेल.६) शेतकऱ्यांसाठी कृषी, कर्ज , वित्त, निविष्ठा आणि इतर सेवा देणाऱ्या यंत्रणांना कृषी सेवा सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी सुलभता येईल.७) सर्व शेतकऱ्यांना वेळेवर कृषी विषयक सल्ले विविध संस्थांकडून शेतकऱ्यांना संपर्क करण्याच्या संधीमध्ये वाढीसह नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचा विस्तार प्रचारात सफलता प्राप्त होईल. ८) या योजनेद्वारे केंद्र व राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सुलभ पारदर्शक पद्धतीने तसेच वेळेवर उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांची ओळख जलद गतीने पटवण्यासाठी पारदर्शक व सोपी पद्धत विकसित या योजनेद्वारे होणार आहे असे सांगण्यात आले आहे.
भोर तालुक्यात सदर ॲग्रीस्टॅक योजनेचे कामकाज ग्राम स्तरावर मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे त्या अनुषंगाने ग्राम महसूल अधिकारी तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत अधिकारी, कृषी सहाय्यक व महा ई सेवा केंद्रामध्ये सदरचे कामकाज सुरू असून तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत आपला सातबारा आधारला लिंक करायचा आहे जेणेकरून फार्मर आयडी शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्याद्वारे भविष्यातील सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे तरी आपल्याकडील आधार कार्ड आधारला लिंक असलेला मोबाईल क्रमांक व सर्व सातबारे आठ उतारे कागदपत्रासह ग्राम महसूल अधिकारी तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व महा ई सेवा केंद्रावर जाऊन योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी तयार करायचा आहे असे आवाहन भोर तालुका ॲग्रीस्टॅक तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष भोर उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी )डॉ. विकास खरात व तहसीलदार राजेंद्र नजन यांनी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना केले आहे.