३३ विद्यार्थी ट्रॉफी विनरचे मानकरी तर ६३ विद्यार्थी सुवर्णपदक विजेते
भोर -येथील ज्ञानपूर्ती प्रोॲक्टिव अबॅकस क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत अव्वल स्थान पटकावुन घवघवीत यश संपादन केले आहे. स्वारगेट पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली. ज्ञानपूर्ती प्रोॲक्टिव अबॅकस क्लासेसला सलग दुसऱ्यांदा बेस्ट सेंटर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. ज्ञानपूर्तीच्या तब्बल एकूण ९६ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत बाजी मारली . या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ भोर येथील वाघजाई माता मंदिर हॉल या ठिकाणी संपन्न झाला.
भोरचे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे, नायब तहसीलदार क्रांती पाटील, ध्रुव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजीव केळकर, जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल व जुनियर कॉलेज भोरच्या प्राचार्य रुबीना सय्यद,जिजामाता इंग्लिश मीडियम प्राथमिक विभाग प्राचार्य स्वाती मोटकर, क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके स्मृती विद्यालयचे मुख्याध्यापक रवींद्र पवार, निवृत्त शिक्षक सिकंदर रणवरे ,भोर एज्युकेशन सोसायटी भोरच्या मुख्याध्यापिका विनया कुलकर्ण, तानाजी लवटे , विद्या प्रतिष्ठानच्या रागिनी भोसले उपस्थित होते. मनोज धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले. ज्ञानपूर्ती क्लासेसचे संचालक निलेश भोईटे यांनी प्रास्ताविक केले सोनाली भोईटे यांनी आभार मानले.
या स्पर्धेमध्ये सान्वी काटे, स्वरांश दिघे, साईराज पाटील, शिवांश नेवसे, श्लोक शिंदे, देवश्री आंबवले, नेत्रज बालगुडे, राजवीर सोले, शरण्या बांदल, शिवस्वी झांबे, समीक्षा अभंग, अर्णवी राऊत, तन्वी चौधरी, स्वरा शिंदे, श्रेया किंद्रे , आलिया आतार, सार्थक किंद्रे सई सुर्वे, सार्थक मरगजे, मधुरा चव्हाण, अभंग लिमन, अनघा जेधे, स्वरांजली जेधे, आयुष कोंढाळकर, स्वरा खोपडे, अनघा भिलारे, शिवतेज तावरे, वृषाली चव्हाण, हर्षदीप देवघरे, अद्वैत आवाळे, समीक्षा लवटे, साईश गरुड, विश्वराज पवार असे ३३ विद्यार्थी विनर ट्रॉफी चे मानकरी ठरले. तर अनन्या बदक, श्रुती मोहिते, सफा आत्तार, अनुराग चव्हाण, साहिल नवले, श्रीतेज मालुसरे, मोक्षदा खुडे, राजवीर काकडे, अनुष्का कंक, अर्णवी भेलके, आर्यन बदक, राजवीर मदने, प्रज्वल लोहार, भाग्येश रिठे, इंद्रजीत प्रधान, श्रावणी मोहिते, समृद्धी करे, प्रणव शेडगे, विहान पालकर, श्री धुमाळ, राघवेंद्र जेधे, श्लोक ढवळीकर, देवराज महांगरे, देव घोरपडे, नेत्रा धरू, मिसबा आत्तार, वेदिका काटकर, प्रतीक्षा राऊत, आयुष अनंतकर, रेवा पोतणीस, स्वरा वरे, सिद्धी जिंकलवाड, विश्वराज सपकाळ, श्लोक म्हेत्रे, कुष्विता तनुकु, मणक खान, ईशान नेरेकर, आर्यन बांदल, ज्ञानदा सोले, रुद्र भेलके, तनिष्का आतकरी, अमृता चव्हाण, अद्विका मदने, मनीष खोपडे, राधिका घोरपडे, अर्णव बुदगुडे, दिव्यम गुजर, श्रेयश सुतार, वरद शेलार, हर्षवर्धन यादव, तनया अंबवले, अनन्या बांदल, आदेश भेलके, श्रेयश तुपे, स्वरूप जाधवर, हर्षवर्धन राजेशिर्के, रुद्र नाझिरकर, साई मुंडलिक, श्रीराम बहिरट, देवश्री सकपाळ, अर्णव शिवतरे, राजवीर कोंढाळकर यांच्यासह ६३ विद्यार्थी सुवर्णपदक विजेते ठरले.