प्रशासनाच्या विविध विभागांतील ४० अधिकारी सेवकांचा सन्मान
भोर – तालुक्यातून यावर्षी २०२४ सालात प्रशासनाच्या विविध विभागात पोलीस दल, सैन्य दल व इतर शासकीय सेवेत निवड झालेले अधिकारी यांचा सन्मान सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगुडघर येथे मंगळवार (दि.२४) करण्यात आला. भोर तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागातील ,खेड्यातील होतकरू तरुण ,तरुणी यांनी जे प्रतिकूल खडतर परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन यश मिळवले त्यांचे कौतुक सन्मानचिन्ह ,शाल श्रीफळ आणि डॉ आनंदा कंक लिखित “युद्ध नको बुद्ध हवा हे पुस्तक देऊन करण्यात आले. योगेश धामुणसे , वैभव कंक , प्रकाश कंक, विकास कंक, बाजीराव दिघे , संगीता रेणुसे ,मधुरा पोळ ,अरुण साळेकर ,श्रीकांत गोळे यांच्यासह विविध क्षेत्रातील एकूण ४० सेवकांचा सन्मान करण्यात आला
यावेळी या कार्यक्रमाला सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद बांदल , सचिव दिपक पारठे, कार्याध्यक्ष अरुण राजीवडे , सल्लागार डॉ. आनंदा कंक , माऊली बदक , शरद डेरे, यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. या कार्यक्रमाप्रसंगी निगुडघर गावचे सरपंच मंगल कंक, सिताराम साळेकर, दादू दुरकर, लक्ष्मण पारठे, अंकुश मळेकर ,भगवान बांदल , संतोष दिघे, मारुती बांदल , श्रीपती रेणुसे,अशोक बांदल, राजेंद्र किंद्रे, सुभाष भेलके , जिजाबा पारठे आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद बांदल यांनी केले तर आभार अरुण राजीवडे यांनी मानले.सूत्रसंचालन डॉ आनंदा कंक यांनी केले.