Monday, August 17, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

कापूरव्होळ -भोर-मांढरदेवी रस्ता १९ डिसेंबर ते ५ जानेवारी कालावधीकरिता बंद

by Aakanksha Yadav
December 21, 2024

रस्ता काम सुरू असताना वाहतूकीमुळे होत आहे मोठा अडथळा; सुरक्षिततेसाठी उपाययोजना

भोर -मांढरदेवी  रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंट रस्ता करण्याचे काम सुरू असून ये -जा करणा-या वाहनांच्या वाहतुकीमुळे या कामाला मोठा अडथळा निर्माण होत असल्याने भोरचे उपविभागीय अधिकारी,कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग, पोलीस प्रशासन , महसूल विभाग यांच्या अहवाल मागणीनुसार कापूरव्होळ – भोर -मांढरदेवी रस्ता यात्रेकरूंसाठी १९ डिसेंबर २०२४  ते ५ जानेवारी २०२५ पर्यंत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बंद करण्यात आला आहे. पर्यायी रस्त्याने वाहतूक वळविण्यात आली आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

             जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पुण्याहून व इतर ठिकाणांहून श्री क्षेत्र मांढरदेवीला जाणारी वाहतूक भोरला न जाता पुणे सातारा महामार्गाद्वारे सुरुर फाट्यापासुन वाईमार्गे मांढरदेवकडे वळविण्यात आली आहे. काळेश्वरी देवीची यात्रा १२ जानेवारी पासून २९ जानेवारी या कालावधीत संपन्न होणार आहे. मांढरदेवी यात्रेसाठी राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त काळेश्वरी देवीचे दर्शनासाठी येत असतात. सदर यात्रा कालावधीमधील काळेश्वरी देवीचे दर्शनासाठी भोर, आंबाडेमार्गे आंबाडखींड घाटातून काळेश्वरी देवीला जाणा-या भाविकांची संख्या हि मोठ्या प्रमाणावर असते. सद्यस्थितीमध्ये भोर ते मांढरदेवी रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंटरस्ता कॉंक्रीटीकरण तयार करणेचे काम सरु असून सदर रस्त्याचा बहुतांश भाग हा नादुरुस्त स्वरुपाचा तसेच घाट रस्त्यामध्ये अद्याप ब-याच ठिकाणी सुरक्षा कठडे नसलेचे व नादुरुत्त स्वरुपात असून सुरक्षेच्या दृष्टीने परिपूर्ण उपाय योजना पूर्ण झालेल्या नाहीत. रस्त्यावर वाहनांची वाहतूक वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते.

आंबाडखिंड घाट मांढरदेवी प्रारंभ पर्यंत सिंगल रोड‌ अरुंद रस्ता आहे. घाट प्रारंभ ते घाटमध्य भागापर्यंत रोडचे काम केलेले नाही. त्यामुळे सदरचा रस्ता हा  घाटाच्या मध्यभागी नादुरुस्त व अरुंद असून नवीन रोडचे काम सुरु आहे. त्याठिकाणी एकेरी रोडची वाहतुक सुरु आहे.  भोरचे प्रांताधिकारी डॉ.विकास खरात , तहसीलदार राजेंद्र नजन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता राजसाहेब आगळे व पोलीस निरीक्षक आण्णासाहेब पवार यांनी संयुक्तपणे सदर रस्ता पाहणी केली .या कालावधीत रस्ता पुर्ण करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला दिले आहेत .या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होऊ शकते तसेच  त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे सरंक्षक कठडे नाहीत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या काळात येणाऱ्या भाविकांनी भोरला न जाता पर्यायी पुणे सातारा महामार्गावरील सुरूर फाट्यावरून वाईमार्गे मांढरदेवला जावे सुरक्षिततेसाठी व अपघात टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सदरचा रस्ता बंद करण्यात आला आहे असे भोरचे उपविभागीय अधिकारी डॉ विकास खरात यांनी सांगितले.

Tags: Bhor
Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
कृष्णा विश्व विद्यापीठाच्या शिरवळ कॅम्पसचे भूमिपूजन संपन्न: सहकार महर्षी जयवंतरावजी भोसले यांच्या जन्मशताब्दी वर्षातील ऐतिहासिक पाऊल

कृष्णा विश्व विद्यापीठाच्या शिरवळ कॅम्पसचे भूमिपूजन संपन्न: सहकार महर्षी जयवंतरावजी भोसले यांच्या जन्मशताब्दी वर्षातील ऐतिहासिक पाऊल

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group