गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सामाजिक शांतता, सुरक्षा,न्याय व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस पाटील महत्वाच्या भूमिका बजावत असतात.पोलिस पाटील दिनानिमित्त अशाच भोर तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांचा सन्मान भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
त्याप्रसंगी भोर पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष सुधीर दिघे, सचिव विठ्ठल झांजले, खजिनदार मिलिंद काळे, जिल्हा सदस्य बाळु साने, कार्यकारिणी महिला सदस्या शर्मिला खोपडे,विद्या गायकवाड, सुनिल कंक, शंकर पारठे, निवृत्ती साळेकर,विजय रांजणे ,राजीवडे पाटील उपस्थित होते.