दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये २१ लाख ८ हजार ६५१ रुपयांची वसुली
भोरला शनिवार (दि.१४) झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण ४०७ प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी २८ प्रलंबित प्रकरणांमध्ये तडजोड होऊन १७ लाख ४१ हजार ११८ रुपयांची वसुली झाली तसेच या लोक अदालती मध्ये १४६८ दाखल पूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यापैकी १८ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन ३ लाख ६७ हजार ५३३ इतक्या रकमेची वसुली झाली अशी सर्व एकूण १८७५ प्रकरणांपैकी ४६ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन एकूण २१ लाख ८ हजार ६५१ रुपयांची वसुली झाली.
या राष्ट्रीय लोक आदालती मध्ये पॅनल क्रमांक-१ चे पॅनल जज म्हणून नेहा नागरगोजे, दिवाणी न्यायाधीश व पॅनल सदस्य बाळासाहेब गोगावले तर दुसरीकडे पॅनल क्रमांक-२ चे पॅनल जज म्हणून मीना जाधव, पॅनल सदस्य अमित साठे यांनी कामकाज पाहिले. सदर लोकअदालतीसाठी भोर वकील संघटनेचे अध्यक्ष मयुर धुमाळ, सचिव राकेश कोंडे, विठ्ठल दुधाणे, शिवाजी मरळ, दत्तात्रय ऊरूणकर, सचिन बागल, विकास किंद्रे, अजिंक्य मुकादम, धीरज चव्हाण, साहिल मुकादम, राजश्री बोरगे, मनिषा तारु, धनश्री सुर्वे,अनिता गायकवाड, गौरी जाधव, इतर सर्व वकील सदस्य उपस्थित होते. तसेच दिवाणी न्यायालयाचे सहायक अधिक्षक सुमेध गुजर व न्यायालयीन कर्मचारी कैलास आखाडे व त्यांचे सहकारी वर्ग, पोलिस कर्मचारी, महावितरण, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ बडौदा, बॅंक ऑफ महाराष्ट्र, वंदे मातरम पतसंस्था व पंचायत समितीचे अधिकारी व ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.