खंडाळा: राजेंद्र उच्च माध्यमिक विद्यालयात तालुका विधी सेवा समिती खंडाळा तसेच दिवाणी व फौजदारी न्यायालय यांच्या वतीने कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य शब्बीर नालबंद होते.
कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ॲड. आनंद फडके यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना पोक्सो कायद्याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी सर्वसामान्यांना कायद्याचे ज्ञान असणे किती महत्त्वाचे आहे, हे अधोरेखित केले.
तसेच ॲड. अनिस मुजावर यांनी एड्स जनजागृतीवर मार्गदर्शन केले, तर ॲड. प्रतिक शेळके यांनी मानवी हक्क व त्याची गरज यावर विद्यार्थ्यांना माहिती दिली. ॲड. महेश राऊत यांनी पिडीतांसाठी मानधन योजनेबाबत महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केले.
प्राचार्य शब्बीर नालबंद यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भारतीय राज्यघटनेचा व कायद्याचा आपल्या देशासाठी असलेला महत्वाचा भाग समजावून सांगितला. “राज्यघटनेचे व कायद्याचे पालन करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्री खांडके यांनी केले, तर प्रास्ताविक प्रविण बोरगावे यांनी केले. शेवटी जे.एस. सांळूखे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.