जागतिक हिंसाविरोधी २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर पंधरवड्याचे आयोजन
भोर – सध्या सर्वत्र महिला-मुलींबाबत अत्याचाराच्या घटना वाढत आहेत त्याच पार्श्वभूमीवर समाजात महिला – मुलीं सुरक्षित राहण्यासाठी महिला सक्षमीकरण व सशक्तीकरणासाठी गावागावात विविध उपक्रम राबविले जात आहेत असाच एक उपक्रम भोर शहराच्या नजीक असणाऱ्या बसरापूर या ठिकाणी विद्यमान महिला सरपंच निलम झांजले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ मासूम या संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात आला . महिला व तरुण तरुणी यांना लैंगिक हिंसेच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी गावातील जानकादेवी मंदिरात जनजागृती कार्यक्रम सोमवार (दि.२५) आयोजित करण्यात आला होता यावेळी गावातील मोठ्या संख्येने महिला तरुणी उपस्थित होत्या.
समाजात वाढणा-या लैंगिक शोषणाच्या, हिंसेच्या घटना रोखण्यासाठी या संस्थेमार्फत जनजागृती करण्यात आली. लैंगिक हिंसा म्हणजे संमती शिवाय केलेली लैंगिक कृती असुन लैंगिक छळ, शोषण, अत्याचार, बलात्कार, छेडछाड, पाठलाग, जबरदस्ती, दबाव टाकणे, अश्लील फोटो- व्हिडिओ, चेष्टा, दुहेरी अर्थाने बोलणे , लैंगिक अवयवांवरून शेरेबाजी, टक लावून पाहणे, शिट्टी वाजवणे, शारीरिक लगट, प्रवासात, बाजारात, कामाच्या ठिकाणी होणारे शोषण अशा लैंगिक हिंसा असुन अशा हिंसा झाल्यास दोष न देता पिडीतांना मदत आधार देणे , छेडछाड , बलात्कार करू पाहणाऱ्यांचा प्रतिकार केला पाहिजे, पोलीस स्टेशनला तक्रार केली पाहिजे, मुलां मुलींना चांगला स्पर्श, वाईट स्पर्श यांची माहिती दिली पाहिजे, गावपातळीवर लोकांनी एकत्र येऊन लैंगिक हिंसेच्या विरोधात उघडपणे चर्चा करून लढा दिला पाहिजे असे कार्यक्रमातुन मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मासूम संस्थेचे पवन पाटील, मेघना मराठे, स्वाती बांदल, शुभांगी गोळे, पायल हजारे, विद्या जाधव, गावचे सरपंच निलम झांजले, पोलीस पाटील विठ्ठल झांजले, माजी सरपंच रमेश झांजले, विष्णू पवार,मोहन बदक, दिलीप झांजले व ग्रा.प.सदस्यांसह मोठ्या संख्येने महिला तरुणी उपस्थित होते.