शिरवळः येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे इंग्लिश मीडिएम स्कूलमध्ये तीन दिवसीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २७, २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी रंगवेध चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहित संस्थेच्या उपाध्यक्षा व एम. ई. एस. इंग्लिश मीडियम स्कूल शाला समितीच्या अध्यक्षा आनंदी पाटील यांनी दिली. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या कार्यक्रमाला आनंदी पाटील यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
२८ नोव्हेंबर दुपारी ४ वाजता व्यंगचित्रकार चारूहास पंडित यांच्या हस्ते कार्यक्रमाचा समारोप व बक्षिस वितरणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी म.ए.सो. नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांची उपस्थिती असणार आहे. म.ए.सो.चे उपाध्यक्ष प्रदीप नाईक कार्यक्रमाचे असणार आहेत. तसेच २९ नोव्हेंबर सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत शिरवळ ग्रामस्थ, गावातील इतर शाळांसाठी, पालकांसाठी हे चित्रकला प्रदर्शन खुले असणार आहे, तरी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य स्वाती जोशी व एमईएस स्कूलच्या वतीने करण्यात आले आहे.