भोरः राज्यात २८८ मतदान संघात मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता एक्सिट पोलचे सर्व्हे माध्यमांत येऊ लागले आहेत. ५ सर्व्हेमध्ये युतीचे पारडे जड असे चित्र आहे. भाजप पक्ष सर्वांत मोठा पक्ष या निवडणुकीच्या निकालात ठरू शकतो असा अंदाज या एक्सिट पोल्समध्ये वर्तविण्यात आले आहेत. मात्र, हरियाणा विधासभेच्या निवडणुकीत एक्सिट पोल्सचा अंदाज फोल ठरल्याने यावर किती विश्वास ठेवायचा आहे मोठा प्रश्न आहे. राज्यात सरासरी ६२ टक्के एवढे मतदान झाले आहे. यामध्ये सर्वांत जास्त मतदान कोल्हापूर तर सर्वांत कमी मतदान मुंबई शहरमधून झाले आहे. यामुळे आता मतदान तर झाले आता निकालाची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे. २० नोव्हेंबर या दिवशी उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाल्याने आता उमेदवारांना निकालाची धाकधूक लागल्याचे पाहिला मिळत आहे.
भोर विधानसभेत चौरंगी लढत तर पुरंदर विधानसभेत तिरंगी लढत कोण ठरणारा विजयाचा दावेदार याची अनेकांना उत्सुकता लागलेली आहे. भोर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पूर्ण ताकतीने चार उमेदवार उतरल्याचे पाहिला मिळाले. तर पुरंदर विधानसभेत तीन उमेदवारांंनी एकमेकांविरोधात दंड थोपटले. यामुळे या दोन्ही मतदार संघात व्हाय व्होल्टेज ड्रामा पाहिला मिळाला. दोन्ही मतदार संघातील मुख्य लढत असलेल्या सर्वच उमेदवारांनी मतदार संघ पिंजून काढून मतदानासाठी आवाहन केले. मग यामध्ये टीका, आरोप-प्रत्योरोप असे काही प्रसंग देखील घडले. भोरमध्ये यंदाची निवडणूक संग्राम थोपटे यांची असत्वाची लढाई मानली जात आहे, तर पुरंदरमध्ये विद्यमान आमदार राहिलेले संजय जगताप यांना सत्ता कायम टिकण्याचे आव्हान पाहिला मिळाले. भोरमध्ये थोपटे, मांडेकर, कोंडे आणि दगडे हे मैदानात होते. तर पुरंदरमध्ये जगताप, शिवतारे आणि झेंडे यांनी एकमेकांविरोधात दंड थोपटले होते.
आत्मविश्वास कमी अन् धाकधूक अधिक
मूळात यंदाची निवडणूक या दोन्ही मतदार संघात अत्यंत चुरशीची झाली. मुख्य लढत असलेल्या उमेदवारांंनी आपापल्यापरीने रणांगणात आपणच दावेदार असल्याचे छातीठोकपणे मतदारांना सांगितले. येत्या शनिवारी २३ नोव्हेंबरला मतपेट्या उघडल्या जाणार असून, मतपेटीत बंद झालेल्या उमेदवारांचा भवितिव्य ठरणार आहे. यामुळे येथील सर्वच उमेदावारांना काही अंशी आत्मविश्वास तर अधिक प्रमाणात धाकधूक वाढल्याचे पाहिला मिळत आहे.
कार्यकर्ते थंडावले
मतदान झाल्यानंतर उमेदवारांच्या कार्यकर्ते स्वस्थ झाले आहेत. भोर आणि पुरंदरमध्ये गेल्या काही दिवसांपासून तयार करण्यात आलेला निवडणुकीचा मोहोल आता शांत झाला आहे. यामुळे त्या काळात आपल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ फिरणारे कार्यकर्ते थंडावलेले आहेत.