भोरः २० नोव्हेंबर म्हणजेच आज राज्यातील २८८ मतदार संघात मतदान प्रक्रिया पार पडत सुरू आहे. यामुळे शहरात राहणारे मतदार आपला मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी गावाकडे जात आहेत. पुणे-सातारा महामार्गावर मोठ्या प्रमाणार वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. तब्बल १५ किलोमीटर अंतरापर्यंत वाहने धिम्या गतीने पुढे सरकत होते. यामुळे मतदारांची कुचंबना झाली. आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर मतदार वाहतूक कोंडीत सापले होते. शिवरे व खेड शिवापूर येथील उड्डाणपुलाचे काम संबंधित ठेकेदार कंपनीकडून धिम्या गतीने सुरू आहे. याचा परिणामी येथे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे.
या महामार्गावर मोठ्या झालेल्या वाहतूककोंडी सुरळीत करण्यासाठी महामार्ग वाहतूक पोलीस व राजगड वाहतूक पोलीस दिसून आले नाहीत, असे स्थानकांचे म्हणणे आहे. या वाहतूक कोंडीकडे प्रशासनाने कायम दुर्लक्ष केले असून कामाच्या ठिकाणी रस्त्याच्या कामाचा बोजवारा उडाल्याने वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. या वाहतूक कोंडीत अनेक रुग्णवाहिका देखील अडकल्या असल्याचे दिसत आहे. तरीही या प्रश्नासाठी वेळ न देता प्रशासनाने कायम कानाडोळा करत असल्याचे नागरिक सांगत आहेत. शिवरे येथील उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावी, अशी मागणी प्रवाशांना राजगड न्यूजसोबत बोलताना केली आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया
मतदान करण्यासाठी निघालेल्या अनेक वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणावर जेष्ठ नागरिक देखील दिसून आले. त्यांना दोन ते तीन तास वाहतूक कोंडीत घालवायला लागल्याने त्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र शब्दांत रोष व्यक्त केला.
कुलदीप कोंडेंची रस्त्यावर उतरून मदत
अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे जे भोर विधानसभेत निवडणुकीसाठी उभे आहेत. ते स्वःताह देखील या वाहतूक कोंडीत अडकले होते. कोंडे हे वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे पाहिले मिळाले.