मुळशी: महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकरांनी मुळशी तालुक्यातील गावे आणि सोसायटीमध्ये मतदारांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन मांडेकरांना दिले. मुळशी तालुका पुणे शहराच्या जवळ असूनही मुळशीतील गावांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. येथे औद्योगीकरण नसल्यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळत नाही. त्यामुळे तालुक्यातील युवा पिढीला बाहेरच्या तालुक्यांमध्ये जावे लागते. याला सर्वस्वी जबाबदार विद्यमान आमदार असल्याचा हल्लाबोल मांडेकर यांनी विद्यमान आमदारांवर केला. तसेच त्यांनी केवळ त्यांच्या घरच्यांना मोठं केले, असे देखील ते यावेळी म्हणाले. यामुळे गाफील न राहता मतदारसंघाचा विकासासाठी मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
मांडेकरांनी मुळशी तालुक्यातील ताथवडे, जांबे, नेरे कासारसाई, दत्तवाडी, मारुंजी, हिंजवडी या गावांना भेट दिली. यावेळी मांडेकर यांच्या स्वागतासाठी ग्रामस्थांनी ठिकठिकाणी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. अनेक ठिकाणी त्यांच्यावर जेसीबीवरून पुष्पवृष्टी करण्यात आली. तर बैलगाडीवरुन मिरवणूक काढत स्वागत करण्यात आली. यावेळी संतोष घोरपडे, जीवन कोंडे, दशरथ जाधव, सुनील गायकवाड, किरण राऊत, राजाभाऊ रेणुसे, सुनील शेंडकर, कुंदन गंगावणे, अंकुश मोरे, राजाभाऊ वाघ, दीपक कारंजावणे, गोविंद निकाळजे, नंदू भोईर , पै. राजाभाऊ जाधव, संदीप पवार, विजय गायकवाड, दीपक टेमगिरे, योगेश शिंदे, गणेश गायकवाड, बाळासाहेब भिंताडे, आनंदा लाटे, गणपत जगताप, सागर साखरे, कपिल बुचडे, सचिन जांभुळकर, दिनेश पिंजन, कौस्तुभ शिखरे, गणेश शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.