Friday, August 21, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

भोर – महामार्ग पट्ट्यातील तरुण नेतृत्त्व भाजपमध्ये प्रवेश करणार? मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभेने वाढली राजकीय चर्चा

by SBPRNL
December 1, 2025
भोर – महामार्ग पट्ट्यातील तरुण नेतृत्त्व भाजपमध्ये प्रवेश करणार? मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभेने वाढली राजकीय चर्चा

भोर:  नगरपालिकेची निवडणूक जवळ आल्याने राजकीय हालचालींना वेग आला असून आज भोरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर शहरापासून महामार्ग पट्ट्यापर्यंत चर्चेत असलेला प्रमुख मुद्दा म्हणजे त्या भागातील एका तरुण नेतृत्त्वाचा भाजपमध्ये प्रवेश होणार का? याबाबत निश्चित घोषणा नसली तरी राजकीय वर्तुळात त्याबद्दल मोठी चर्चा असून हा प्रवेश झाला तर आगामी निवडणुकीच्या समीकरणांवर मोठा परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा रंगली आहे.

सदर युवक गेल्या काही वर्षांपासून सामाजिक काम, शैक्षणिक उपक्रम व क्रीडा प्रोत्साहनात सक्रिय आहे. विशेषत: भोर-खंडाळा महामार्ग पट्ट्यातील तरुणांमध्ये त्याचे चांगले संपर्क आणि मजबूत जनाधार आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत थेट रिंगणात उतरण्याची त्याची इच्छा असल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली आहे. विकासाभिमुख विचारसरणी, तरुणांना संधी आणि बदलाची आवश्यकता या मुद्द्यावर तो सतत आवाज उठवत आला आहे. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश झाल्यास पक्षाला तरुण आणि प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये मोठा फायदा होईल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

You might also like

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

भोर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणांगणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभेमुळे भाजपचा उत्साह वाढला असताना, या तरुण नेत्याच्या संभाव्य प्रवेशामुळे त्या उत्साहात आणखी वाढ झाली आहे. अनेक कार्यकर्ते आणि समर्थक सभेसाठी मोठ्या संख्येने दाखल होणार असल्याचे दिसून येत आहे.

संभाव्य उमेदवारांच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांत उमेदवारीसाठी हालचाल सुरू आहे. तरुण नेत्यांच्या नेतृत्वामुळे ग्रामीण भागात राजकीय समीकरणे बदलू लागली असून त्यामध्ये महामार्ग पट्ट्यातील हा युवक निर्णायक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत नवीन नेतृत्व, विकास आणि प्रामाणिकतेच्या मुद्यावर मतदान होणार असल्याने आजची सभा अनेकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

राजकारणात तरुण पिढीचा सहभाग वाढत असताना त्या युवकाचा भाजप प्रवेश होतो की नाही, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त
ताज्या बातम्या

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

July 20, 2026
Next Post
भोर – ठाकरे गटाला मोठा धक्का; आदित्य बोरगे यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश — महामार्ग पट्ट्यातील राजकारणात नवे समीकरण

भोर – ठाकरे गटाला मोठा धक्का; आदित्य बोरगे यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश — महामार्ग पट्ट्यातील राजकारणात नवे समीकरण

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group