भोर: भोर विधानसभेचे अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांच्या प्रचार दौऱ्याला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून दि. १५ नोव्हेंबर रोजी त्यांची मुळशी तालुक्यात कोपरा सभा आणि प्रचार दौरा पार पडला. कोंडे हे रिक्षा चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. मुळशीचा विकास व्हायला पाहिजे तितका तो झाला नाही. विद्यमान नेतृत्वाला दूरदृष्टी नसल्याने ही वेळ असल्याचे कोंडे यावेळी बोलताना म्हणाले. तसेच भोर विधानसभेतील तालुक्यांचा हायटेक विकास करायचा आहे, यामुळे अर्धा रात्री पैसे वाटणाऱ्याला नाही, तर अर्धा रात्री मदतीला धावून येणाऱ्याला मतदान करण्याचे आवाहन कोंडे यांना येथील मतदारांना केले. मुळशी तालुक्याचा हायटेक विकास करण्यासाठी शेतकऱ्याचा मुलगा कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी बोलताना कोंडे यांनी दिली.
मुळशी तालुक्यात बाहेरील लोकांनी येऊन फार्महाऊस रिसाँर्ट करण्यापेक्षा येथील भुमिपुत्र, शेतकरी, पर्यटन व्यवसायात उद्योजक झाला पाहिजे हे माझे स्वप्न आहे. माझ्या पाठीशी सर्वसामान्य जनशक्तीचा आधार आहे. त्याच आधाराच्या जोरावर आपल्याला घराणेशाही बंद करायची आहे. तुमच्या सर्वांच्या हक्काचा माणूस मी आहे, यामुळे येणाऱ्या मतदानाच्या दिवशी मला मतदानरूपी आशिवार्द द्या, असे आवाहन अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांनी केले. कोंडे यांनी मुळशी तालुक्यातील पौड, करमोळी, सावरगाव, चाले, दखणे, कुळे, नाणेगाव, चिखलगाव, नांदगाव, होतले, साळेसाई, डोंगरगाव, कोळवण, भालगुडी, वाळेण, हाडशी, काशिंग, मुगवडे आदी भागांतील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी कुलदीप कोंडे यांच्या समवेत त्यांच्या समर्थकांसह येथील वयोवृद्ध महिला आणि नागरिकांनी कोंडे यांच्या पाठीशी राहणार असल्याचे सांगितले.