स्वच्छता सेवक म्हणून ख्याती तर आतापर्यंत १० तालुक्यात मतदान जनजागृती
भोर – मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून प्रत्येकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे यासाठी शासनाकडून अनेक उपक्रम राबविले जात आहेत, असाच एक उपक्रम एका ग्रामस्थानेच उराशी बाळगून स्वेच्छेने मतदान करा, लोकशाही बळकट करा असा फलक आपल्या गळ्यात बांधून भोरच्या बाजारपेठेत फेरी मारत मतदान जनजागृती करत मतदान करण्याचे नागरिकांना आवाहन केले.
अकोला तालुक्यातील डोंगरगाव (जि.अहमदनगर) मधील रहिवाशी हरिभाऊ ऊगले वय वर्षे ५८ यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आपल्या स्वतःच्या गळ्यात फलक अडकवुन शहरात मतदान करा, लोकशाही बळकट करा असे आवाहन नागरिकांना केले. वयोवृध्द असुनही समाजसेवेचा वसा घेतलेल्या यांनी संगमनेर, पारनेर ,अकोले ,राळेगणसिद्धी, चौफुला, शिरूर ,बारामती ,पुणे ,भोर अशा ठिकाणी मतदान जनजागृती केली आहे.