खेड शिवापुर: वेळू येथील एका कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे. १२ नोव्हेंबर मंगळवार सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका कंपनीला आग लागली. या आगेच्या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती मिळत आहे. ही आग इतकी भीषण स्वरुपाची होती, की काही वेळातच संपूर्ण आगीने या कंपनीवार ताबा मिळवला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवतहानी झाली नसली तरी कंपनीचे मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अस्पष्ट असून, पीएमआरडीएच्या दोन अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आगीवर नियंत्रण आणून आग आटोक्यात आणली.
दीड दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतरही अग्निशमन दलाचे जवान व स्थानिक नागरिक यांना आग आटोक्यात आणण्यात यश आले. ज्वलनशील पदार्थामुळे आग आटोक्यात येण्यास उशीर होत होता. वेळू येथील कल्पना ग्लास या कंपनीमध्ये ही आगीची दर्घटना घडली आहे. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कंपनीत अचानकपणे आग लागली. या आगीने रौद्ररुप धारणे केली आणि काही क्षणताच कंपनीच्या आत असणाऱ्या आगीत जूळून खाक झाल्या आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर कंपनीचे आर्थिक नुकसाना झाले आहे. ही कंपनी पेट्रोल पंपासाठी लागणारे पॅनल बनवते व त्यासाठी लागणारे एफआरपी मटेरियल वापरले जाते. हे मटेरियल अत्यंत ज्वलनशील असल्या कारणाने यावेळी काम करत असताना अचानकपणे यातील एका पॅनलला आग लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, यामुळे कंपनीमध्ये असलेले इतर ज्वलनशील पदार्थांनी मोठ्या प्रमाणावर पेट घेतला व क्षणार्धामध्ये या आगीने पूर्ण कंपनीचा ताबा घेतला.