भोरः आघाडीचे उमेदवार संग्रामा थोपटे यांनी वेल्हा (राजगड) तालुक्यात मोडणाऱ्या पानशेत धरण भागातील गावांना भेट देत नागरिकांशी संवाद साधला. पानशेत धरण भागातील मुख्य पानशेत ते घोलपघर रस्ता, घोलपघर ते कोशिंमघर – भालवडी रस्ता, कादवे-वडघर रस्ता, कादवे येथील साकव, कम्युनिटी हॉल ही कामे झाली आहेत. आगामी काळात मुळशीला जोडणारा रस्ता मार्गी लावण्याचा मानस असून अनेकांनी प्रलोभने दाखवली, पण या भागातील जनता सदैव साहेबांपासून व आपल्या सोबत राहिली असल्याचा अभिमान असल्याचे संग्राम थोपटे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी शंकर आण्णा ठाकर, माऊली शिंदे, नानासो राऊत, दिनकरराव धरपाळे, अमोल नलावडे, दिनकरआण्णा सरपाले, सीमा राऊत, विकास अण्णा पासलकर, दुर्गा चोरगे, छाया काळे, अमोल पडवळ, प्रमोद लोहकरे, शिवराज शेंडकर, गणेश जागडे, आकाश वाडघरे, महाराज कोकाटे, लक्ष्मणराव तावरे, भगवानराव बांदल, लहू अण्णा निवंगुणे, गोपाळ दसवडकर, अनंता शेंडकर, संभाजी खुटवड यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वेल्हा (राजगड) तालुक्यातील कुरण, वरसगाव- गोरडवाडी, साईव- पडाळघरवाडी, मोसे, पानशेत, रुळे, ओसाडे, निगडे मोसे, आंबेड, खामगांव रांजणे, कोंडगाव या गावांना भेटी दिल्या. वरसगाव-गोरडवाडी हे पूर्णपणे शेतीवर अवलंबून असलेले गाव आहे. डोंगरी भाग असल्याने या गावात विजेचा प्रश्न होता, त्यावर उपाय म्हणून सोलर पॅनलच्या माध्यमातून मुबलक पाणी पुरविण्याचे काम करता आले, पुनर्वसन गावठाणच्या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे, तसेच पुनर्वसनमध्ये जी जमीन गेली आहे ती पुन्हा शेतकऱ्यांना मिळावी, या दोन्ही प्रश्नांच्याबद्दल सकारात्मक भूमिका असल्याचे थोपटे यावेळी म्हणाले. पाण्याची सोय व्हावी यासाठी बांधण्यात आलेल्या धरणामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमीनी गेल्या आहेत. त्यांना त्यांच्या हक्काच्या जमीनी कशा मिळतील, यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे थोपटे यांनी सांगितले.