जेजुरीः MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग. गेल्या काही वर्षांपासून या ना त्या कारणाने आयोगावर टीका केली जाते. उशिरा होणारी भरती प्रक्रिया असेल किंवा मग भरती प्रक्रियेतली घोळ. आता पुन्हा एकदा आयोगावर सोशल माीडियाच्या माध्यमातून ट्रोलिंग करण्यात येत आहे. आता ट्रोलिंग कशामुळे केलं जातंय तर त्याच झाल अस की महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ याची परीक्षा शनिवारी राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर पार पडली. या परीक्षेत तुमच्या मित्राला दारु प्यायला आवडते आणि तुम्हाला जर मित्रांनी दारु प्यायला लावली तर तुम्ही काय कराल अशा स्वरुपाचा प्रश्न विचारला होता. या अजब प्रश्नामुळे परीक्षार्थिंनी यावर संताप व्यक्त करीत आयोगाने विचारलेल्या प्रश्नावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
हा प्रश्न सोशल मीडियावर व्हायरल होत असून आयोगाला नेटकरी ट्रोल करीत आहेत. तसेच आयोगाच्या या अजब प्रश्नावर टीकेची झोड उठवत आहेत. यावर बोलताना एका प्ररीक्षार्थीने तर थेट पेपर सेट करणाऱ्या आयोगाला धारेवर धरल दारु किंवा गांजा पिऊन पेपर सेट केला होता का ? असा खोचक प्रश्न आयोगाला केला आहे. यामुळे आयोगाची विश्वासर्हता ढासळत चाललेली असल्याचे मत देखील परीक्षार्थी विद्यार्थ्यांने व्यक्त केले आहे.