विद्यार्थ्यांना विविध साहित्यासह , खाऊ वाटप
भोर – राज्यात सर्वत्रच शाळा ,महाविद्यालये ही शनिवार १५ जून ला सुरू झाली असून जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी शाळेत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
भोर तालुक्यातही शहरासह ग्रामीण भागातील सर्व शाळा , महाविद्यालयांकडून शाळेत येणाऱ्या आजी माजी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तालुक्यातील भोर शहराच्या नजीक असणाऱ्या भोलावडे गावात विद्यमान सरपंच प्रविण जगदाळे यांनी गावातील जि.प.शाळेच्या शिक्षकांच्या सहकार्याने विशेष उपक्रम राबवत शाळेत नवीन येणाऱ्या व पास होऊन पुढील शैक्षणिक वर्गात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची गावातुन ट्रॅक्टरवर भव्य मिरवणूक काढीत विद्यार्थ्यांना फेटे बांधून विविध शालेय साहित्य, पाठ्यपुस्तके,खाऊ वाटप करत दणक्यात वाजत गाजत स्वागत केले .
यावेळी गावचे विद्यमान सरपंच प्रविण जगदाळे, उपसरपंच अविनाश आवाळे, माजी उपसरपंच गणेश आवाळे,ग्रा प सदस्य प्रशांत पडवळ, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय अब्दागिरे, शाळेचे मुख्याध्यापक प्रा.मनोज जगताप,प्रा.अनिता लोहोकरे,श्रीमती गायकवाड मॅडम,प्रा.यशवंत कंक, गावातील ग्रामस्थ, महिला तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यातील बालवडी, पसुरे, टिटेघर या गावांसह सर्वच ठिकाणी विद्यार्थ्यांचे वाजत गाजत जंगी स्वागत करण्यात आले.