भोर प्रतिनिधी – कुंदन झांजले
पुढील वर्षी होणाऱ्या विविध लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयार होणाऱ्या मतदार याद्यांचे काम सुरू असून मतदार यादीत नाव नोंदणीची अंतिम मुदत शनिवार दिनांक ९ डिसेंबर २०२३ आहे.त्यामुळे ज्यांची वयाची १८ वर्षे पूर्ण झालेली आहेत किंवा येत्या १ जानेवारी रोजी ती पूर्ण होणार आहेत अशा सर्व पात्र व्यक्तींनी आपले नाव मतदार यादीत उद्याच्या दिवशी शनिवार दिनांक ९ डिसेंबर २०२३ रोजी नोंदवावे असे आवाहन भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे,तहसीलदार सचिन पाटील निवडणूक विभागाने केले आहे.
नाव नोंदणीसाठी आपले गावातील बीएलओ ( शाळेचे शिक्षक) यांना संपर्क करावे, किंवा तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेत संपर्क करावा व ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी Voter Helpline App किंवा NVSP portal द्वारे करता येणार आहे . उद्या दिनांक ९ डिसेंबर २०२३ पर्यंत प्राप्त अर्जांवर कार्यवाही करण्यात येणार असून त्यांची नावे मतदार यादीत घेण्यात येणार आहेत असेही सांगितले आहे.तरी आपल्या गावातील, आजुबाजुच्या परिसरातील शासकीय अधिकारी, सरपंच, उपसरपंच, गावातील पदाधिकारी, सोसायटीचे चेअरमन, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, गणेश मंडळ अध्यक्ष, मुंबई, पुणे, बाहेरगावी परगावी रहाणा-या गावातील गावक-यांचे अध्यक्ष , पत्रकार या सर्वांनी आपले जवळचे मित्र, कुटुंबातील सदस्य, यांना नाव नोंदविण्यासाठी कळवावे असे सांगितले गेले आहे.
.