भोर – भोर- राजगड (वेल्हे) तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ आयोजित तालुकास्तरीय गुणगौरव समारंभ २०२५-२६ शनिवार (दि.४) रोजी नसरापूर येथील जानकीराम मंगल कार्यालय येथे पार पडला. यामध्ये भोरमधील विद्या प्रतिष्ठान भोर इंग्लिश मीडियम स्कूल विद्यालयातील मुख्याध्यापिका अश्विनी संतोष मादगुडे यांना गुणवंत उत्कृष्ट मुख्याध्यापक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच याच वि विद्यालयातील लिपीक रवींद्र जगदाळे यांना गुणवंत लिपिक म्हणून सन्मानित करण्यात आले. भोर ,राजगड (वेल्हे) तालुका माध्यमिक व तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. हा पुरस्कार डॉ. भाऊसाहेब कारेकर शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद पुणे व जयंत आजगावकर शिक्षक आमदार यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी शाळेतील शिक्षक संतोष मादगुडे , रवींद्र जगदाळे व रागिणी भोसले उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भाऊसाहेब कारेकर (शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद पुणे), प्राध्यापक जयंत आसगावकर (शिक्षक आमदार), डॉ. गणपत मोरे (शिक्षण उपसंचालक पुणे विभाग), नंदकुमार सागर (सचिव महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ) ,प्रसाद गायकवाड (अध्यक्ष पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ), सुनील गायकवाड (अध्यक्ष भोर मुख्याध्यापक संघ)यांची विशेष उपस्थिती लाभली. भोर व राजगड (वेल्हे) तालुका यामधून एकूण सात मुख्याध्यापकांना उत्कृष्ट मुख्याध्यापक या पुरस्काराने गौरविण्यात आले.

















