भोर – जसजशी निवडणूक जवळ येत जाईल तसतसे भोर तालुक्यात नेत्यांच्या फेऱ्या वाढणार आहेत या नेत्यांनी कायमस्वरूपी भोर तालुक्याचे पाणी पळवल्याचा प्रयत्न केला असुन माझ्याबद्दल मुळशीत नेत्यांनी माझ्या अंगात पाणी नाही अशी टीका टिप्पणी केली परंतु त्या नेत्यांना मला आवर्जून सांगायचे आहे की, माझ्या अंगात किती पाणी आहे हे आपणाला लोकसभेच्या निवडणुकीत दाखवले आहे आणि येणाऱ्या विधानसभेलाही भोरची आणि या मतदारसंघातील जनता तुम्हांला चांगल्या पध्दतीचे पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही असे सडेतोड उत्तर अजित पवार यांच्या टिकेला नाव न घेता भोर येथील कोपरासभेत संग्राम थोपटे यांनी केले.
भोर- राजगड (वेल्हा) -मुळशी तालुक्यातील महाविकास आघाडीचे काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष ,व मित्रपक्ष यांचे आघाडीचे अधिकृत उमेदवार संग्राम थोपटे यांच्या प्रचार दौऱ्या निमित्त रविवार (दि१०) सायंकाळी भोर शहरात ठीक ठिकाणी कोपरा सभांचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी झालेल्या सभेत संग्राम थोपटे बोलत होते .थोपटे पुढे म्हणाले की ,भोर शहरात १०० कोटी रुपयांची विविध विकास कामे खासदार सुप्रिया सुळे , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , आमदार फंड तसेच नगरपालिके मार्फत अशी अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत. मी कधी जातीपातीचं, भागाचं, तालुक्याच, कशाचं राजकारण करत जनतेसमोर आलो नाही फक्त विकासकामे आणि विकास कामांच्या माध्यमातून मत मागण्याचा प्रयत्न मी केला आहे. मी अख्खा मुळशी तालुका फिरून आले मुळशीच मतदान जरी जास्त असलं आता तिथे कोणाची हवा आहे हे गेली पंधरा दिवस पाहिले आहे मी तेथील सर्व हवामान बघितले आहे. मी योग्य वेळेस विरोधकांना योग्य पध्दतीने,चोख प्रतिउत्तर देणार आहे असे वक्तव्य भोर शहरातील नगरपालिका चौक येथील कोपरा सभेत आमदार संग्राम थोपटे यांनी केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत सागळे, माजी नगरसेवक विठ्ठल शिंदे, अमित सागळे , जगदीश किरवे, जयश्री शिंदे, गणेश पवार ,गणेश मोहिते ,समीर सागळे , सुमंत शेटे, अनिल पवार, चंदन कोळसकर, जितेंद्र कंक, गजानन दानवले , चंद्रकांत मळेकर,अनुप धोत्रे आदिंसह मोठ्या संख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते.