Wednesday, June 24, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

विधानसभेचे रणांगणः वाईमधून ‘घड्याळ’ विरुद्ध ‘तुतारी’चा सामना; मकरंद पाटील चौथ्यांदा रिंगणात, डॅा. नितीन सावंत आव्हान उभे करणार?

by SBPRNL
October 25, 2024
विधानसभेचे रणांगणः वाईमधून ‘घड्याळ’ विरुद्ध ‘तुतारी’चा सामना; मकरंद पाटील चौथ्यांदा रिंगणात, डॅा. नितीन सावंत आव्हान उभे करणार?

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

वाईः  दोन्ही राष्ट्रवादीकडून पहिल्या यादीमधील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली आहे. या विधानसभा मतदार संघातून  २००९ पासून आमदार असलेले मकरंद पाटील यांना राष्ट्रवादी (अजित पवार) यांनी चौथ्यांदा उमेवारीच्या रिंगणात उतरले आहे. त्यांना टफ फाईट देऊ शकेल अशा उमेदवाराची चाचपणी राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्या वतीने करण्यात येत होती. अखेर या मतदार संघातून राष्ट्रवादी (शरद पवार) गटाकडून डॅा. नितीन सावंत यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे या मतदार संघात टफ फाईट होणार असे बोलले जात आहे. यातच आपल्या नावाची घोषणा होताच उमेदवार डॅा. नितीन सावंत हे शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झाले आहेत.

विद्यमान आमदार मकरंद पाटील यांचा वाई विधानसभा मतदारसंघात जनसंपर्क दांडगा असला तरी डॉ. नितीन सावंत यांचा विकासासाठीचा झंजावात या निवडणुकीत त्यांना मोठे आव्हान उभे करू शकतो, असे जाणकार सांगतात. डॉ. नितीन सावंत यांच्या मागे ज्येष्ठ नेते शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, माजी खा. श्रीनिवास पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. रोहित पवार तसेच वाई विधानसभा मतदारसंघातील आजी-माजी पदाधिकारी आणि जनतेचे पाठबळ असणार आहे.

घड्याळ विरुद्ध तुतारी अशी लढत

सातारा जिल्ह्यातील वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर या तीन तालुक्यांना एकत्रित करून हा मतदार संघ तयार झालेला आहे. सातारा जिल्ह्यातील एक महत्वाचा मतदार संघ म्हणून या मतदार संघाची ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील हे येथील विद्यामान आमदार आहेत. या आधीच्या निवडणुकीत मकरंद पाटील यांना विरोध केलेले मदन भोसलेही सध्या भारतीय जनता पक्षामध्ये आहेत, दुसरीकडे राष्ट्रवादीमधील फुटीनंतर मकरंद पाटील यांनी अजित पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विधानसभेला मकरंद पाटील यांच्यासमोर कोणाचे आव्हान असणार? याबाबत चर्चा सुरु होत्या. मात्र, आता वाईतून डॉ. नितीन सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने घड्याळ विरुद्ध तुतारी अशी लढत पहायला मिळणार आहे.

२००९ पासून मकरंद पाटील यांचे वर्चस्व

२००९, २०१४ आणि २०१९ असे सलग तीन वेळा मकरंद पाटील यांंनी या मतदार संघाचे नेतृत्व विधानसभेत केले आहे. २०१४ च्या निवडणुकीत वाई विधानसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून मकरंद पाटील आणि काँग्रेसचे मदनराव भोसले यांच्यामध्ये लढत झाली होती. मकरंद पाटील यांना १,०१,२१८ मदनराव भोसले यांना ६२,५१६ मते मिळाली होती. त्यानंतर झालेल्या २०१९ च्या निवडणुकीत मदन भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली. मात्र, त्यांना पुन्हा पराभव स्विकारावा लागला होता. या निवडणुकीत मकरंद पाटील यांना 1 लाख 30 हजार 486 मते तर विरोधी उमेदवार मदन भोसले यांना 86 हजार 839 मते मिळाली होती. आता या निवडणुकीत पाटील हे आपले वर्चस्व कायम राखतील की सावंत त्यांचे वर्चस्व भेदतील हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Tags: bjpfirstlistofmaharashtravidhansabhacandidatemakarandpatilnitinsawantrajgadnewsvai
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
पुरंदर विधानसभेसाठी खर्च निरीक्षक म्हणून सुमित कुमार यांची नियुक्ती

पुरंदर विधानसभेसाठी खर्च निरीक्षक म्हणून सुमित कुमार यांची नियुक्ती

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group