Sunday, June 14, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

वेध विधानसभेचाः इच्छुकांच्या भावूगर्दीत ‘संधी’ कोणाला मिळणार?; पुरंदर-हवेली विधानसभा मतदार संघावर अनेकांकडून दावा

अनेक इच्छुक उमेदवार रांगेत असल्याची सूत्रांची माहिती, इच्छुकांकडून मोर्चेबांधणीला सुरूवात

by SBPRNL
October 2, 2024
वेध विधानसभेचाः इच्छुकांच्या भावूगर्दीत ‘संधी’ कोणाला मिळणार?; पुरंदर-हवेली विधानसभा मतदार संघावर अनेकांकडून दावा

राज्यात २८८ विधानसभा मतदार संघापैकी एक मतदार संघ म्हणजे पुरंदर हवेली मतदार संघ. पुंरदर आणि हवेली हे दोन भाग या मतदार संघात मोडतात. या दोन्ही गोष्टींना जोडणारा दुवा म्हणजे दिवे घाट. घाटच्या वर पुरंदर तर घाटच्या खाली हवेली, असं साध सोपं करुन सांगता येईल. या मतदार संघात ग्रामीण आणि शहरी असे दोन्ही मतदार आहेत. यावर थोडक्यात सांगायचं झाल्यास ग्रामीण भागातील प्रश्न आणि शहरी भागातील समस्या याच मिश्रण म्हणून पुरंदर-हवेली विधानसभा मतदार संघाकडे पाहिलं जातं. विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल केव्हाही वाजू शकतं. यामुळे येथील इच्छुक उमेदवारांनी मतदार संघावर दावा करीत प्रचार यंत्रणा राबवायला सुरूवात केलेली आहे. इच्छुकांच्या भावूगर्दीत संधी कोणाला मिळणार हा सध्याचा प्रश्ना आहे.

 

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

….त्यामुळे येथील राजकीय समीकरणे बदलली 

 

राज्यातील राजकीय समीकरणे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बदलली तशी ती २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत देखील बदलेली आहेत. या गोष्टीचा विचार करता राज्यातील विधासभा मतदार संघावर दावा सांगणाऱ्यांची संख्या देखील वाढली असल्याचे चित्र आपल्याला पाहिला मिळत आहे. या मतदार संघाचे सध्याचे विद्यामन आमदार काँग्रेसचे संजय जगताप हे आहेत. मंत्री राहिलेल्या विजय शिवतारे यांचा पराभव करीत जगताप यांनी विजयाचा गुलाल आपल्या नावे केला. मुख्यत्वे जगताप विरुद्ध शिवतारे असे त्यावेळी निवडणुकीकडे पाहिले गेले. सध्याचे चित्र हे फार वेगळे आणि सर्वांना अचंबित करणारे आहे. या दोन्ही संभाव्य उमेदवारांबरोबर अनेक  जण मतदार संघावर दावा सांगत आमदारकीच्या मैदानात उतरायला तयार झाले आहेत.

 

अनेकांकडून प्रचार यंत्रणा राबवायला सुरूवात 

 

महायुतीमधून माजी मंत्री विजय शिवतारे, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, मा. आमदार अशोक टेकवडे, जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ता झुरंगे ही नावे इच्छुकांची आहेत, असे सूत्रांनी सांगितले. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमधून सध्याचे आमदार संजय जगताप( काँग्रेस) आणि मा. सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून इच्छुक उमेदवार असल्याचे सांगण्यात आले आहे. झेंडे यांनी त्या दृष्टीने खूप आधीपासून मतदार संघ पिंजून काढत प्रचार यंत्रणा राबवायला सुरूवात केलेली आहे. प्रा. दिगंबर दुर्गाडे यांची नावाची शिफारस कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्याकडे केली असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या गोटातून मिळाली आहे. दुर्गाडे यांचे आमदार उल्लेख असलेले बॅनर तालुक्यात ठिकठिकाणी पाहिला  मिळत आहे.

 

संधी कोणाला मिळणार?

 

सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यमान आमदार संजय जगताप यांनाच पुन्हा निवडून द्या, अशा प्रकारचे आशय सांगणारे अनेक पोस्ट व्हिडिओ कार्यकर्ते व्हायरल करीत आहेत. मा. मंत्री विजय शिवतारे हे देखील तालुक्यातील गावांना भेटी देत गावभेट दौरा करीत आहेत. तसेच शासनाच्या योजनांची माहिती त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंडवरील पोस्टच्या माध्यमातून देण्यात येत आहे. तालुक्यात आरोप-प्रत्यारोपांच्या अनेक फिऱ्या झडत आहेत. असे असताना तालुक्यातील अनेक प्रश्नांची सोडणूक आजही झालेली नाही. हे मोठे दुर्देव आहे. येणाऱ्या निवडणुकीला घेऊन येथील नागरिकांच्या संमिश्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया आहेत. ही निवडणूक सोपी नाही. अनेकांकडून दावा मतदारसंघावर सांगण्यात आला असला तरी संधी कोणाला मिळणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

 

…पण प्रश्न आजही प्रलंबित 

 

गुंजवणी पाण्याचा प्रश्न, पुरंदर उपसा सिंचन हे दोन प्रमुख प्रश्न पुरंदर तालुक्यातील नागरिकांचे आहेत. याशिवाय अनेक प्रलंबित प्रश्न आहेत ज्याची सोडवणूक झालेली नाही. निवडणूक आली की या दोन प्रश्नांवर अनेकांकडून भाषणबाजी केली जाते. पुरंदर तालुक्याला नैसर्गिकाचे खूप मोठे वरदान लाभलेले आहे. दिवे घाट पार केल्यानंतर हडपसर पर्यंत अरूंद रस्ता असल्या कारणाने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीमुळे येथील नागरिक व या रस्त्याने प्रवास करणारे हैराण झाले आहेत. असे एक ना अनेक प्रश्न गेल्या अनेक काळापासून प्रलंबित आहेत.

Tags: purandharhaveliasembleyrajgadnewsvidhansabhapurandhar
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post

भोर तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील कर्मचारी विविध मागण्यासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात; १५ अॅाक्टोबर असणार शेवटचा दिवस

ताज्या बातम्या

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

June 12, 2026
शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

June 12, 2026
विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group