दत्तात्रय कोंडे : राजगड न्युज
खेड शिवापूर (वार्ताहार) दि.24 :- विसर्जनासाठी स्वकष्टातून शिवगंगा नदीतील पाणी अडविण्यासाचे काम शिवापूर ता.हवेली येतील सरपंच व उपसरपंच यांनी केले. शिवगंगा नदितीतील पाणी पातळीत घट झाल्याने यावर्षी भागातील गणेश विसर्जन कसे करायचे हा प्रश्न उपस्थित झाला होता,मात्र ग्रामपंचायत शिवापूरचे सरपंच अण्णा दिघे, उपसरपंच राजू सट्टे, मंडळाचे माजी अध्यक्ष शशिकांत दिघे, व ट्रेकर्स योद्धा शिवश्री तुषार दिघे यांच्यासह युवक वर्ग व ग्रामस्थांनी नदीवरील बंधाऱ्याच्या ढापा टाकून पाणी अडविण्यात आले असून त्यांचे भागातून कौतुक होत आहे.
शिवगंगा खोऱ्यातील शिवापूर, श्रीरामनगर, खेड शिवापूर बाग या गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच या तिन्ही गावातील स्थानिक नागरिक आपले गणेश विसर्जन शिवगंगा नदीत करतात, मात्र यावेळी शिवगंगा नदीला पाण्याची कमतरता असल्याने विसर्जन कसे व कोठे करायचे असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला होता. शिवापूर (ता. हवेली) ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच यांनी संबधित प्रशासनाची वाट न बघता नदीवर असलेल्या बंधाऱ्यातील गाळ काढून ढापा टाकण्यात आल्या.
त्यामुळे शिवगंगा नदिमधील पाण्याची पातळी वाढून विसर्जन करता येईलअशी योजना स्व कष्टातून करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.