पंचनामा महसूल विभागाचा भाग २
भोर : तालुक्यात हायवे लगत असणाऱ्या भागात अनेक ठिकाणी हॉटेल,औद्योगिक शेड उभारणी सुरू आहेत.परंतु हायवे लगत असणाऱ्या धांगवडी येथे उभारण्यात आलेल्या सुमारे नऊ शेड साठी वापरण्यात आलेला मुरूम हा अनधिकृत रित्या असून यामध्ये कोणत्याही प्रकारचा महसूल परवाना घेतला नसल्याचे समोर आले आहे.परिणामी या शेड साठी वापरण्यात आलेला लाखो रुपयांचा मुरुम कोठून आणला? याचे उत्खनन कोणी केले तर या सर्वा मागचा पाठीराखा कोण? हे प्रश्न आता अनुत्तरीतच आहेत.
पाठीराखा असलेल्या व्यक्तीचे “कॉल रेकॉर्डिंग” “राजगड न्युज लाईव्हच्या” हाती .
धांगवडी येथे शेड उभारण्यासाठी वापरण्यात आलेल्या अनाधिकृत मुरमाचा पाठीराखा कोण आहे? या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना राजगड न्यूज लाईव्हला एका धक्कादायक रेकॉर्डिंगची माहिती मिळाली आहे. या रेकॉर्डिंगमध्ये, एका व्यक्तीला मुरमाचा वापर करण्याची परवानगी देण्यात आल्याबद्दल बोलताना ऐकू येत आहे.
या रेकॉर्डिंगमध्ये काय आहे?
* एका व्यक्तीला मुरमाचा वापर करण्याची परवानगी देण्यात आल्याबद्दल बोलताना ऐकू येत आहे.
* मुरमाचा वापर करण्यासाठी पैसे देण्यात आल्याचा उल्लेख आहे.
* मुरमाचा वापर बेकायदेशीर आहे हे माहीत असूनही, त्याला परवानगी देण्यात आली आहे.
धांगवडी ता.भोर येथील हायवे लगत एका ग्रुपच्या माध्यमातून औद्योगिक शेड उभारण्यात आले आहेत. या शेडच्या माध्यमातून नक्कीच ग्रामीण भागातील औद्योगीकरण वाढू शकते परंतु या शेड उभारण्यासाठी वापरण्यात आलेला मुरूम ( गौण खनिज) हे शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता अथवा कोणत्याही प्रकारचा नजराणा न भरता वापरण्यात आलेला आहे. या ग्रुप कडून प्रशासनाची फसवणूक केली जात असून प्रशासन यावर कारवाई करेल का हे देखील पाहणे गरजेचे आहे. मागील सहा महिन्यापासून सुरू असलेल्या या कामावर अंदाजे दहा हजार ते पंधरा हजार ब्रास मुरमाचा वापर करण्यात आला आहे. संबंधित किकवी सजा अंतर्गत येणाऱ्या धांगवडी येथे हायवे लागतच हे शेड उभारणी करण्यात आली परंतु संबंधित तलाठी, सर्कल यांचे कोणत्याही प्रकारचे लक्ष गेले नाही की डोळेझाक करण्यात आली?
संबंधितांना काही नागरिकांनी संपर्क केला असता माझे कोणी काही करू शकत नाही? तर मागील तलठ्यांसोबत माझे सर्व बोलणे झाले आहे? माझा पंचनामा करूच शकत नाहीत? कोणी किती प्रयत्न करुदे? माझा पंचनामा केला तर मी काय करू शकतो अधिकाऱ्यांना माहित आहे अशी उत्तरे देखील समोर आली असून यावर आता नक्कीच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या सर्व कारभारा मागील खरा “पाठीराखा” कोण? पाठीराखा असलेल्या व्यक्तीचे “कॉल रेकॉर्डिंग” “राजगड न्युज लाईव्हच्या” हाती लागले असून .प्रशासन त्या अनधिकृत मुरमावर कारवाई करणार का हे पहाणे अपेक्षित आहे. क्रमशः