राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
संग्राम थोपटेंना सलग तिसऱ्यांदा अपयश;भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता, ‘चिठ्ठी’ने ठरला सभापती 6 days ago
“तुम्ही आमच्यावर केसेस करणार मग आम्ही तुम्हाला सोडणार का” उद्योजकाच्या मुलाचे अपहरण… 2 weeks ago
कामथडी पंचायत समिती गणातून मोनिका दशरथ जाधव यांच्यावर जनतेचा विश्वास; निवडणूक रिंगणात विजयाचा निर्धार 1 month ago
संयमी, प्रामाणिक नेतृत्वाला कौल; भोंगवली गणात गणेश निगडे यांना मतदारांची ठाम पसंती, परिवर्तन घडवण्याचा निर्धार 1 month ago
भोंगवली पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या गणेश निगडेंचे पारडे जड 1 month ago
Next
Prev
Home इंदापूर

उजनी धरण शंभरीच्या दिशेने, भीमा नदीत धरणातून पाणी सोडले, पंढरीत पुराचा धोका

घाटमाथ्यासह भीमा खोऱ्यात पावसाचा जोर कायम

by Team Rajgad Publication
August 5, 2024
उजनी धरण शंभरीच्या दिशेने, भीमा नदीत धरणातून पाणी सोडले, पंढरीत पुराचा धोका
0
SHARES
423
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी :सचिन आरडे, इंदापूर

इंदापूर : सह्याद्री घाटमाथ्यासह भीमा खोऱ्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या जोरावर सोलापूर जिल्ह्यातील महाकाय उजनी धरण शंभर टक्के पाणीसाठ्याच्या दिशेने वाटचाल करीत असताना रविवारी सायंकाळनंतर संभाव्य पूर परिस्थिती नियंत्रणासाठी धरणातून भीमा नदीच्या पात्रात ४० हजार क्युसेक तसेच धरणावरील जलविद्युत निर्मितीसाठी १ हजार ६०० क्युसेक असे मिळून ४१ हजार ६०० क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात आले आहे.

धरणाचे १६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. तर दुसरीकडे नीरा नदीतूनही मोठ्या प्रमाणात सोडलेले पाणी भीमा नदीत सोडण्यात आले आहे. त्यामुळे भीमेला पूर येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

You might also like

संग्राम थोपटेंना सलग तिसऱ्यांदा अपयश;भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता, ‘चिठ्ठी’ने ठरला सभापती

“तुम्ही आमच्यावर केसेस करणार मग आम्ही तुम्हाला सोडणार का” उद्योजकाच्या मुलाचे अपहरण…

कामथडी पंचायत समिती गणातून मोनिका दशरथ जाधव यांच्यावर जनतेचा विश्वास; निवडणूक रिंगणात विजयाचा निर्धार

रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत उजनी धरणात दौंड येथून येणारा पाण्याचा विसर्ग एक लाख क्युसेकपर्यंत वाढला होता. धरणात एकूण पाणीसाठा ११२.६८ टीएमसी असून उपयुक्त पाणीसाठा ४९.०२ टीएमसी म्हणजे टक्केवारी ९१.५० एवढी वाढली होती. त्याचवेळी पुण्यातील खडकवासला, बंडगार्डनमार्गे दौंडमार्गे पाण्याचा विसर्ग एक लाख क्युसेकच्या पुढे सरकल्यामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यावर नियंत्रण करण्याचा भाग म्हणून धरणातून भीमेच्या पात्रासह धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यात तसेच भीमा-सीना जोडकालव्यातून पाणी सोडण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.

धरणातून भीमा पात्रात ४० हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात येत असताना दुसरीकडे धरणावरील जलविद्युत प्रकल्पही सुरू केला जात आहे. त्यासाठी १६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. भीमा-सीना जोडकालव्यात २०० क्युसेक विसर्गाने पाणी सोडले जात आहे. दुसरीकडे वीर धरणातून नीरा नदीत ६१ हजार ९२३ क्युसेक विसर्गाने पाणी सोडले जात आहे. हे पाणी अकलूजजवळील नीरा नृसिंहपूरनजीक भीमा-नीरा नदीच्या संगमात मिसळते. नंतर हे पाणी भीमा नदीवाटे पंढरपूरच्या दिशेने येत आहे. त्यामुळे पंढरपुरात चंद्रभाग नदीला पूर येण्याची चिन्हे दिसत आहेत. भीमा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.

ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

संग्राम थोपटेंना सलग तिसऱ्यांदा अपयश;भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता, ‘चिठ्ठी’ने ठरला सभापती
भोर

March 9, 2026
“तुम्ही आमच्यावर केसेस करणार मग आम्ही तुम्हाला सोडणार का” उद्योजकाच्या मुलाचे अपहरण…
क्राईम

March 3, 2026
कामथडी पंचायत समिती गणातून मोनिका दशरथ जाधव यांच्यावर जनतेचा विश्वास; निवडणूक रिंगणात विजयाचा निर्धार
पुणे

February 6, 2026
संयमी, प्रामाणिक नेतृत्वाला कौल; भोंगवली गणात गणेश निगडे यांना मतदारांची ठाम पसंती, परिवर्तन घडवण्याचा निर्धार
ताज्या बातम्या

संयमी, प्रामाणिक नेतृत्वाला कौल; भोंगवली गणात गणेश निगडे यांना मतदारांची ठाम पसंती, परिवर्तन घडवण्याचा निर्धार

February 4, 2026
भोंगवली पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या गणेश निगडेंचे पारडे जड

February 2, 2026
राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार शंकर मांडेकर मैदानात; भोंगवली–कामथडी गटात आज हाय व्होल्टेज कोपरा सभा

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024
Breaking News: खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटी रुपयांची रोख रक्कम नेणारे वाहन पोलिसांनी पकडले; पकडलेले वाहन सत्तेतील बड्या आमदाराचे? 

October 21, 2024

Bhor Newsसावधान!!हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा ,पुन्हा एकदा शाळांना सुट्टी जाहीर.

0

पहिल्या वेतनाच्या रकमेतून बालचमुंना दाखविला “डंका हरिनामाचा” सिनेमा

0

Bhor News सावधान||भोर तालुक्यातील वरंधा घाट माथ्यावर अतिवृष्टी,या भागातील धानवली गावातील नागरिकांचे स्थलांतर

0

Bhor Breaking News पसुरेत वीजेच्या खांबावरून घसरून वायरमन जखमी

0
संग्राम थोपटेंना सलग तिसऱ्यांदा अपयश;भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता, ‘चिठ्ठी’ने ठरला सभापती

संग्राम थोपटेंना सलग तिसऱ्यांदा अपयश;भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता, ‘चिठ्ठी’ने ठरला सभापती

March 9, 2026
“तुम्ही आमच्यावर केसेस करणार मग आम्ही तुम्हाला सोडणार का” उद्योजकाच्या मुलाचे अपहरण…

“तुम्ही आमच्यावर केसेस करणार मग आम्ही तुम्हाला सोडणार का” उद्योजकाच्या मुलाचे अपहरण…

March 3, 2026
कामथडी पंचायत समिती गणातून मोनिका दशरथ जाधव यांच्यावर जनतेचा विश्वास; निवडणूक रिंगणात विजयाचा निर्धार

कामथडी पंचायत समिती गणातून मोनिका दशरथ जाधव यांच्यावर जनतेचा विश्वास; निवडणूक रिंगणात विजयाचा निर्धार

February 6, 2026
संयमी, प्रामाणिक नेतृत्वाला कौल; भोंगवली गणात गणेश निगडे यांना मतदारांची ठाम पसंती, परिवर्तन घडवण्याचा निर्धार

संयमी, प्रामाणिक नेतृत्वाला कौल; भोंगवली गणात गणेश निगडे यांना मतदारांची ठाम पसंती, परिवर्तन घडवण्याचा निर्धार

February 4, 2026

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2026 राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.) | Powered by राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2023 Rajgad news.live