२३ उमेदवारांतुन १५ उमेदवारांचे अर्ज पात्र वैध, तर ८ जणांचे १६ अर्ज अवैध बाद
भोर -२०३विधानसभा मतदारसंघात विधानसभा सदस्यासाठी दाखल केलेल्या नामनिर्देशन अर्जाबाबत तक्रार ,हरकत नोंदविणे व अर्ज वैध ,अवैद्य ठरविणे बाबत उमेदवार सदस्यांची छाननी प्रक्रिया बुधवार (दि३०) २०३ भोर विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात पार पडली. यामध्ये २९ ऑक्टोबरला शेवटच्या दिवशी २३ उमेदवारांचे ३१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यातील १५ अर्ज वैध पात्र तर छाननीत ८ उमेदवारांचे १६ अर्ज बाद झाल्याची माहिती प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी दिली.
भोर विधानसभेसाठी भोर -राजगड (वेल्हा)- मुळशीतून विविध राजकीय पक्षांकडून ३१ उमेदवारी अर्ज भरले गेले होते. बुधवारी दि.३० ऑक्टोबरला झालेल्या छाननी प्रक्रियेत कागदपत्रांच्या त्रुटी अभावी १६ अर्ज बाद झाले तर संग्राम अनंतराव थोपटे, शंकर हिरामण मांडेकर, अनिल संभाजी जगताप, लक्ष्मण राम कुंभार, कुलदीप सुदाम कोंडे, किरण दत्तात्रय दगडे, पियुशा किरण दगडे, प्रमोद पंडित बलकवडे, बाळासाहेब रामदास चांदेरे, भाऊ पांडुरंग मरगळे , राहुल चांगदेव पवार, सचिन सदाशिव देशमुख , समीर विठ्ठल पायगुडे, सूर्यकांत राजाराम माने, संजय भाऊसाहेब भेलके अशा १५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. या १५ वैध पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी कोण माघार घेणार आणि कोण रिंगणात लढणार याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
तसेच अवैध,बाद झालेल्या अर्जामध्ये रणजित शिवतरे, शरद ढमाले, जीवन कोंडे, स्वरूपा थोपटे, अभिषेक वैराट, रामचंद्र मानकर, अनिल सपकाळ,भरत शेडगे अशा आठ मात्तबर उमेदवारांचे कागदपत्रांची पूर्तता करताना त्रुटी आढळल्याने हे अर्ज अवैध ,बाद झाले आहेत.