नसरापूर: महाआघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी येथील नागरिकांशी गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने संवाद साधला. केलेल्या विकास कामांची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली. तसेच संग्राम थोपटे यांनी यावेळी नागरिकांसोबत मुक्त संवाद साधत त्यांच्या अडचणी देखील समजून घेतल्या. यावेळी नसरापूर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नसरापूर आणि आसपासच्या ठिकाणी विस्तारीकरणामुळे या ठिकाणी जागेची उपलब्धता ही कमी होत चाललेली आहे. या अगोदर केलेली अनेक विकास कामे माहिती पुस्तकाच्या माध्यमातून सांगितली आहे. प्रलंबित असलेली विकासकामे करण्याकरिता प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी थोपटे यांनी बोलताना दिली.
यावेळी राजगडचे संचालक के. डी. सोनवणे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष रवींद्र बांदल, मानसिंग धुमाळ, माजी सभापती लहूनाना शेलार, शिवाजी कोंडे, नसरापूरचे उपसरपंच सुधीर वाल्लेकर, खरेदी विक्री संघाचे माजी संचालक ज्ञानेश्वर झोरे, इरफान मुलाणी, गणेश दळवी, महेश दळवी, शंकर शेटे, माऊली पांगारे, सोमनाथ सोमाणी, निखिल डिंबळे, विशाल डिंबळे, निलेश भोरडे, अनिल शेटे, संदीप कांबळे, माऊली चव्हाण, रमेश शिळीमकर, मदन खुटवड, बापू जगताप आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नसरापूर येथील अनेकांनी थोपटे यांना पाठिंबा दर्शवला असून या ठिकाणची आरोग्य व्यवस्था, इमारत आधी प्रलंबित कामांसाठी सदैव प्रयत्नशील असणार असल्याचे त्यावेळी म्हणाले. 13 कोटी रुपयांची पाण्याची योजना सुरू करण्यात आली. टाकीची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असून अधिक दाबाने पाणीपुरवठा गावातील नागरिकांना देण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्य रस्त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्या कामासाठी निधी देण्यात आला. परंतु पावसामुळे रस्ता खचून गेला आहे. बनेश्वर येथील मुख्य रस्त्याचे काम करणे गरजेचे असून बनेश्वर केळवडे रस्ताच्या डांबरीकरणाचे काम केले आहे. गावाला पर्याय रस्ता उपलब्ध करून देण्यात आला आहे. या ठिकाणची बाजारपेठ टिकली आणि वाढली पाहिजे, असा प्रामाणिक हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.
चेलाडी येथे अत्याधुनिक आरोग्य केंद्राची निर्मिती
चेलाडी येथील पशुसंवर्धन विभागाच्या 40 गुंठे जागेत सुनील केदार हे मंत्री असताना ती जागा जिल्हा परिषदच्या नावावर वर्ग करण्यात आली असून त्या ठिकाणी अत्याधुनिक प्रकारचे आरोग्य केंद्राची निर्मिती होणार असल्याची माहिती थोपटे यांनी दिली. त्यासाठीचा ॲक्शन प्लॅन देखील तयार असल्याचे ते म्हणाले.
‘या’ उमेदवाराने दिला संग्राम थोपटे यांना जाहीर पाठिंबा
राजगड तालुक्यातील माणगाव येथील सैनिक समाज पार्टीचे उमेदवार अनिल संभाजी जगताप यांनी भोर विधानसभेचे आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शिवराज शेंडकर, विकास पासलकर, जितेंद्र साळुंके, राजेंद्र कडू, नानासाहेब राऊत , गणेश जागडे यांच्या प्रयत्नातून अनिल जगताप यांनी थोपटे यांना पाठिंबा जाहीर केला. यामुळे संग्राम थोपटे यांनी जगताप यांचे आभार मानले