राजगडः १७ वर्षीय मुलगा येथील एका नामांकित महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी घराच्यांना सांगून घराबाहेर पडला तो घरी परतला नाही. यामुळे काळजीत असल्याने घराच्या व्यक्तींनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी जे काही घरांच्या समोर आले. त्यावेळी त्यांच्या पायाखालची जमिनीच सरकली. येथे असलेल्या एका नामांकित महाविद्यालयात बाभळीच्या झाडाला मुलाचा साडीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आलेल्या सर्वांनाच मोठा धक्का बसला. शिवराज नारायण रेणुसे वय वर्ष १७ असे गळफास घेतलेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेने त्याच्या घराच्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, विद्यार्थ्यांमध्ये देखील भीतीचे वातावरण तयार झाले आहे. राजगड पोलिसांनी मयत असलेल्या मुलाच्या मृत्यूची नोंद केली असून या प्रकरणाचा पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत.
परीक्षा असल्याचे सांगून शिवराज पडला घराबाहेर अन्…
दिनांक ३ नोव्हेंबर रोजी दत्तात्रय विष्णू रेणुसे यांच्याकडे शिवराज नारायण रेणुसे (वय वर्ष १७) हा गावी राहण्याकरिता आला होता. त्याचे आईवडील हे पुण्यात राहिला आहेत. ४ नोव्हेंबरच्या सकाळी ९ वाजता शिवराज हा त्याच्या चुलत भावासोबत महाविद्यालयात नायगाव येथून निघून गेला. यानंतर बराच वेळ झाला तरी शिवराज हा त्याच्या पुण्यातल्या घरी परतला नाही. शिवराजच्या घराच्या व्यक्तींनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना समजले की शिवराज हा पेपरलाच गेला नव्हता. मग प्रश्न होता तो नेमका गेला तरी कुठे? यानंतर सर्वांनी शिवराजचा शोध नसरापूर येथे घेण्यास सुरुवात केली. शिवराजच्या शिक्षकांनी त्यांना सांगितले की तो पेपरला आलाच नाही. अखेर शिवराजच्या कॅालेजच्या सूरज पवार या मित्राने शिवराजचा चुलत भाऊ करण लक्ष्मण रेणुसे याला फोन करून तुम्ही चेलाडी येथे या, आल्यावर सगळं सांगतो आणि पुढे जे काही समोर आलं त्यामुळे सगळ्यांच्याच पायाखालची वाळू सरकली.
मित्राने सांगितली हकीकत
त्यानंतर सर्वजण चेलाडी येथे सुरज पवार याचेकडे आले. त्याने सर्वांना राजगड पोलीस स्टेशन येथे नेले. त्याने पोलिसां समक्ष सांगीतले, नायगावकडे जाणारे रोडच्या कडेला जिथे सर्व मुले अभ्यास करीत असतात. तेथे झाडाला कोणीतरी लटकत आहे. हे आम्ही पाहीले आहे, आम्ही घाबरलो असल्याने जवळ गेलो नाही. तरी तुम्ही सोबत येवून खात्री करा असे म्हटल्यावर सर्वजण घटनास्थळी गेले. एका बाभळीच्या झाडच्या फांदीला शिवराज नारायण रेणुसे (वय 17 वर्ष) रा मेरायण ता वेल्हा जि पुणे याने साडीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यानंतर सर्व नातेवाईकांनी व त्याचे मित्र व पोलीसांच्या मदतीने शिवराज याला बेशुध्द अवस्थेत गळफासातून खाली उतरवून नसरापुर येथील एका खाजगी रुग्णालयात नेले. मात्र, डॅाक्टरांनी शिवराजला तपासून मयत घोषित केले. यामुळे सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून शिवराज याच्या अशा अकाली जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी दत्तात्रय विष्णू रेणुसे वय 23 वर्ष व्यवसाय शेली रा मेरावणे ता वेल्हे ता वेल्हे जि पुणे यांनी राजगड पोलिसांत खबर दिली असून याचा पुढील तपास पोलीस हवालदार बरकाले हे करीत आहेत.