भोर: राजगड ऑनलाईन ! बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दीड लाखाच्या मताधिक्याने निवडून आल्या असून केंद्रात आता त्यांना कोणते खाते मिळते? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे भोर तालुका प्रमुख ज्ञानेश्वर शिंदे यांनी सुप्रिया सुळेंचे (Supriya Sule) बॅनर लावले असून त्यानंतर सुप्रिया सुळेंना केंद्रिय कृषीमंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
ज्ञानेश्वर शिंदे यांनी भोरमध्ये सुप्रिया सुळे यांची बारामती लोकसभा मतदार संघातून खासदार व केंद्रीय कृषीमंत्री पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे बॅनर लावले आहे. लोकसभा निकालानंतर दिल्लीत सत्तास्थापनेसाठी बैठकांचं सत्र सूरू असतानाच, सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची थेट केंद्रीय कृषीमंत्री पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करणारे बँनर लागल्यानं या बँनरची परिसरात चांगलीच चर्चा होत आहे.
पुणे सातारा महामार्गावर शिंदेवाडी येथे लागलेले हे फलक, या महामार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.