सुपाः पुणे व सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रात्रीचा फायदा घेत अनेक चोरीच्या घटना घडल्या होत्या. या घटनेतील आरोपींच्या मागावर पोलीस होते. या प्रकरणी सुपा पोलिसांनी धकाडेबाज कामगिरी करीत एकूण ४ आरोपींना अटक केली असून, यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. आरोपींकडून पोलिसांनी १५ लहान-मोठ्या घंटा, १ पानेश्वर देवाची मुर्ती, २ मुकुट, २ समई, १ पंचार्थी असा माल हस्तगत करण्यात आला आहे.
पुणे ग्रामीण जिल्ह्यातील तसेच शेजारील सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मंदिरात चोरीच्या अनेक घटना घडलेल्या होत्या. सदरच्या चोऱ्या या मंदिरात होत असल्याने व तो लोकांच्या भावनेचा आणि श्रध्देचा विषय असल्याने सदरचे आरोपी हे अटक करणे हे एक मोठे आव्हान असल्याचे पोलिसांनी सांगितले.
रस्त्याच्याकडेला संशियितरित्या थांबलेल्या गाडीमुळे आरोपींचा लागला छडा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ सप्टेंबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक नवसरे यांनी रात्रगस्ती असणारे अंमलदार यांना रात्रगस्त करुन मंदिरात चोऱ्या होवू नयेत, या करिता पोलीस स्टेशनचे अमंलदार सचिन दरेकर व सागर आशोक वाघमोडे यांना सूचना दिल्या होत्या. रात्रगस्ती दरम्यान दंडवाडी गावच्या हद्दीत एक मारूती सुझुकी कंपनीची अल्टो ८०० कार ही रस्त्याच्या कडेला नंबर प्लेटवर चिखल लावून संशईतरित्या थांबलेली पोलिसांना दिसली. रात्रगस्त अंमलदार हे सदर गाडीजवळ जाताच गडीतील इसमाने सदरची गाडी वेगात सुपे बाजूकडे घेवून गेला.
पोलिसांनी पाठलाग करुन आरोपींना घेतले ताब्यात
त्याचवेळी शेजारीच असलेल्या विठ्ठल मंदिरातील दोन अनोळखी इसम हे त्या ठिकाणाहून अंधारात पळून गेले. त्यावेळी रात्रगस्त अंमलदार यांनी सदर घटनेची माहिती तात्काळ रात्रगस्तसाठी असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांना दिली. ते तात्काळ स्टाफसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कार घेऊन पळालेल्या इसमाचा पाटलाग करुन त्यास लोणंद जि. सातारा येथून ताब्यात घेतले. तसेच अंधाराचा फायदा घेऊन पळालेल्या इसमांना देखील पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता
याप्रकरणी पोलिसांनी ओंमकार शशिकंत सांळुखे (रा. आनंदपुर ता. वाई जि. सातारा सध्या रा. शिरवळ पंढरपुर फाटा ता. खंडाळा जि.सातारा), तुषार अनिल पवार (रा. दत्तनगर सांगवी रोड ता. खंडाळा जि.सातारा) सौरभ दत्तात्रय पाटणे रा. शिरवळ ता. खंडाळा जि.सातारा व एक अल्पवयीन बालक अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी वाई, राजगड, लोणंद, सातारा, जेजुरी व इतर ठिकाणी सदर प्रकारचे गुन्हे केल्याबाबत सांगत असल्याने तेथील गुन्हेही उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, उपविभागिय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, कुलदिप संकपाळ, जिनेश कोळी, सहा. फौजदार कारंडे, पो. हवा. रुपेश साळुंके, राहुल भाग्यवंत, संदिप लोंढे, विशाल गजरे, अनिल दनाणे अभिजीत एकशिंगे, स्वप्नील अहिवळे, विनोद पवार, पो. कॉ. सचिन दरेकर, सागर वाघमोडे, संतोष जाविर, तुषार जैनक, महादेव साळुंके, किसन ताडगे, रुषीकेश विर, होमगार्ड शिवतारे यांनी केली आहे.