भोरः सध्याचा काळ खरंतर मोठा फास्ट आणि फॅार्वर्ड झालेला आहे. मुले व्यसनाच्या आहारी जात असून, त्यांच्या हातून अनेक गुन्हे घडत आहेत. त्यामुळे येणारा काळ अतिभयानक स्वरुपाच असण्याची शक्यता जाणकरांकडून वर्तवली जात आहे. या गोष्टींपासून मुलांना लांब ठेवणे हे पालकांसमोर मोठे आव्हान बनले आहे. या हेतूमधून भोर, राजगड कला व क्रीडा प्रतिष्ठान तसेच माणुसकी प्रतिष्ठान आयोजित विद्यार्थ्यींनीसाठी प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांचे “संघर्षातून यशाकडे, बाप समजावून घेताना” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानालात विद्यार्थ्यांनाप्रमाणेच पालकांचा देखील उस्फूर्त सहभाग लाभला. व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांना आपल्या मनातील भावना व्यक्त करताना अश्रू अनावर झाले होते.
विद्यार्थिनींनी सांगितले की, आजपर्यंत आई-वडिलांनी आपल्यासाठी केलेल्या कष्टांची जाणीव नव्हती. हंकारे यांच्या व्याख्यानानंतरच त्यांना समजले की, खऱ्या अर्थाने आपण किती भाग्यवान आहोत. अनेक विद्यार्थिंनीना व्याख्याना दरम्यान रडू अनावर झाले होते. भोर ,राजगड कला व क्रीडा प्रतिष्ठान व माणुसकी प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत “संघषीतून यशाकडे, बाप समजावून घेताना” या विषयावर प्रसिद्ध वक्ते वसंत हंकारे यांनी भोर तालुक्यातील विद्यालयातील विद्यार्थांना व्याख्यान दिले. आजकालच्या मुली व्यसनाधीन होत आहेत आणि गुन्हेगारीकडे वळत आहेत, यामुळे त्यांचे पालक अडचणीत येत आहेत. हे अल्पवयीन मुलींना समजत नाही. हंकारे यांनी १३ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना बाप काय असतो आणि त्याची जबाबदारी काय असते याचे हृदयस्पर्शी विवेचन केले.
या व्याख्यानमालेत कुलदीप तात्या कोंडे, अमोल भाऊ पांगारे, राजेंद्र शास्त्री, नितीन आप्पा सोनवले, दीपक बर्डे, दशरथ जाधव, शालका कोंडे, बाळासाहेब जायगुडे, अनिल भेलके, गणेश धुमाळ, विशाल जाधव, बंटी जगताप आदी आवर्जून उपस्थित होते. ज्या मुलांना आई वडील नाहीये तसेच जी मुले अनाथ आहेत, त्यांचा शैक्षणिक खर्च कुलदीप कोंडे यांच्या वतीने केला जाणारा असल्याची घोषणा या व्याख्यानमालेत करण्यात आली.