भोरः भोर, वेल्हे व मुळशी तालुक्यातील सुमारे अडीच हजार महिला कोल्हापूरची आंबाबाई आणी संत बाळूमामाच्या चरणी लीन झाल्या आहेत. या आध्यात्मिक यात्रेच्या माध्यमातून दर्शन मिळाल्यामुळे महिलांनी याविषयी समाधान व्यक्त केले. भाजपाचे भोर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण दगडे पाटील यांच्या माध्यमातून भोर, मुळशी, राजगड(वेल्हे) तालुक्यातील तब्बल २५०० महिलांना ५० बसेसमधून कोल्हापूरमधील अंबाबाई आणी संत बाळूमामाचे दर्शन घडविण्यात आले. प्रत्येक रविवारी निघणाऱ्या अध्यात्मिक यात्रेचा हा भाग होता.
अंबाबाई, संत बाळूमामा यांचे दर्शन झाल्याने मोठे समाधान महिलांच्या चेहऱ्यावर दिसत होते. भोर, वेल्हे व मुळशी तालुक्यातील संगमनेर, वरोडी, करंद, वर्वे खुर्द आळंदेवाडी, नीलकंठ, शिरगाव, पाले, खडक, नेरे, दिवळे, न-हे, सारोळा माळवाडी, नांदगाव, मालेगाव, करंजे, हातवे बुद्रुक, कापूरहोळ, केंजळ भोर शहर, निधान सांगवी, कारी, किकवी, साळवडे, कारंजावणे, मांगदरी आदी गावातील महिलांसाठी मोफत आध्यात्मिक यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान महिलांना दर महिन्याला मोफत आंबाबाई व बाळूमामाचे दर्शन आध्यात्मिक यात्रेचे आयोजन किरण दगडे यांच्या माध्यमातून मोफत केले जात आहे. आत्तापर्यत सुमारे अडीच हजार महिलांनी या यात्रेचे लाभ घेतला असून, भविष्यात हे काम सुरुच राहणार आहे. तसेच जनतेचे समाधान हाच माझा आनंद असून या पुढील काळातही महिलांसाठी अध्यात्मिक यात्रा सुरु राहणार असल्याचे किरण दगडे पाटील यांनी सांगितले.