शिरवळः एस. के. युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सााहिल सलीम काझी यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत नायगाव जि. सातारा आयोजित दिवाळी सवित्री माईंच्या माहेरची २०२४ या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. जाती-पातीच्या पलीकडे जाऊन शिव-शाहू-फूले आंबेडकर यांचे विचार जोपासत समाजकार्याची जोपासने करणारे काझी यांचे सामाजिक कार्यात मोठे योगदान आहे. कोरोनाच्या काळात जिवाची पर्वा न करता सर्व सामान्य नागरिकांपर्यंत मदत काझी यांनी पोहचवली आहे.
अपघात ग्रस्तांना मदतीचा हात त्यांनी दिला आहे. तसेच अनेक बेवारस अंत्यविधी, गोर गरिबांना मदत करणे, आपत्कालीन परिस्थितीतमध्ये धाऊन जात मदत करणे सामाजिक बांधीलकीच्या भावनेने समाजिक कार्य करणारे साहिल भाई काझी राहणार शिरवळ यांनी केले आहे. सूर्यरत्न युथ फाउंडेशन शिरवळ परिसरात करीत असलेल्या सामाज कार्याची दखल घेत मला विशेष सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सन्मान सावित्रीमाईच्या लेकिंचा नायगाव येथील उच्च शिक्षित होऊन शासकीय सेवेत कार्यरत करत असलेल्या सवित्री माईच्या लेकिंना देखील सन्मानित करण्यात आले. याबद्दल सुर्यरत्न युथ फाउंडेशनच्या सर्व आयोजक पदाधिकारी यांचे मनापासून आभारी काझी यांनी मानले.